Homeमहाराष्ट्रMahayuti Seat Sharing Update Chhatrapati Sambhaji Nagar Municipal | संभाजीनगरमध्ये महायुतीत बहुतांश...

Mahayuti Seat Sharing Update Chhatrapati Sambhaji Nagar Municipal | संभाजीनगरमध्ये महायुतीत बहुतांश जागांवर तोडगा: खासदार कराड यांच्या निवासस्थानी खलबते, 5 तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर एकमत – Chhatrapati Sambhajinagar News

आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाचा तिढा अखेर आज सुटला असून, बहुतांश जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. खासदार भ

.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्यासह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक वॉर्डातील ताकद आणि उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, रस्सीखेच असलेल्या जागांवरही आता सामंजस्याने तोडगा काढण्यात आला आहे.

याद्या वरिष्ठांना पाठवल्या – राजेंद्र जंजाळ

या बैठकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “शिवसेना-भाजप नैसर्गिक युतीमध्येच छत्रपती संभाजीनगर महापालिका लढवण्याचे वरिष्ठांचे आदेश होते. त्या आदेशाच्यादृष्टीने आम्ही तीन-चार बैठका केलेल्या आहेत. आज भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या संभाव्य वॉर्डाची आणि उमेदवारांच्या याद्या बनवण्यात आल्या आहेत. दोन्ही याद्या वरिष्ठांकडे पाठवल्या जातील. आज संध्याकाळपर्यंत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून दोन्ही यांद्यावर मंजुरी देतील आणि त्यानंतर महायुतीची एकत्रित बैठक घेऊन जागावाटप जाहीर केले जाईल.”

इच्छुकांची उत्सुकता शिगेला

महायुतीचे जागावाटप अंतिम झाल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय मैदानात निवडणुकीचा ज्वर अधिकच चढणार आहे. शिवसेनेच्या ‘बाण’ आणि भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर कोण-कोणते उमेदवार रिंगणात उतरतात, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

हे ही वाचा…

पुण्यात राष्ट्रवादीची युती तुटली:165 जागांसाठी महाविकासचा फॉर्म्युला, पण वंचितच्या मागणीने पेच; शिंदे-अजित पवार जवळ येणार?

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचं प्राथमिक सूत्र ठरवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेत एकूण 165 जागा असून, त्यापैकी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी प्रत्येकी 50 जागांवर निवडणूक लढवण्यावर तिन्ही पक्षांमध्ये प्राथमिक एकमत झालं आहे. उरलेल्या 15 जागा या वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षासाठी खुल्या ठेवण्याची तयारी या तिन्ही पक्षांनी दर्शवली आहे. महाविकास आघाडी अधिक व्यापक करण्यासाठी वंचित आणि आपचा समावेश करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!