Homeमहाराष्ट्रChhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Election 2026 News Shivsena Leader Aditya Thackeray speech...

Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Election 2026 News Shivsena Leader Aditya Thackeray speech on jeep reminds Balasaheb Thackeray


छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांचे जीपवरील भाषण राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, सर्व पक्षांकडून जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. महापालिकांमध्ये युती, आघाडींसंदर्भात निर्णय होत असताना, आदित्य ठाकरेंनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी त्यांनी समर्थकांना संबोधित केलं. मात्र यावेळी त्यांनी जीपवरुन उभं राहून केलेल्या भाषणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अनेकांना आदित्य ठाकरेंना जीपवर चढलेलं पाहून बाळासाहेब ठाकरेंची आठवण आली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

1968 मध्ये सभेला परवानगी नाकारल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ओपन जीपच्या बोनेटवर चढून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. आदित्य ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा हीच शैली वापरली तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांसमोर बाळासाहेबांचं दृश्य उभं राहिलं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर मातोश्रीबाहेर अशाच प्रकारे शिवसैनिकांशी संवाद साधला होता.

इतकंच नाही तर आदित्य ठाकरे यांनी संस्थान गणपतीला नारळ फोडून केला महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केली. हिंदूह्रदयसम्रागट बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील संस्थान गणपती येथील नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला होता.

आदित्य ठाकरेंनी भाषण करताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “हे सरकार आपल्याला परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी मोर्चा काढला, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. पालकमंत्र्यांचे व्हीडिओ येतात, पैसे दिसतात हे पैसे कुठून येतात? इथल्या खासदारची कसली दुकानं आहेत? बॅगेतले पैसे निवडणुकीत बाहेर येतील त्याला हात लावू नका”.

“मुंबईत आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. हे लोक फक्त लुटालूट करतात. हे वसुलीबाज हफ्तेबाज आहेत. ते शिवसेना नाही ते मिंधे चिंधी चोर टोळी आहे. आपण पाणी मागितले, रस्ते मागितले हे सोडून ते भलते काही बोलतील, कामाचे बोलणार नाही. हे म्हणतील मेट्रो देतो.  यांना विचारा पाणी द्या मग बाकीचे बोला. दाखवण्यासारखे काही नाही, मग जातीय तेढ निर्माण करतात, नोकऱ्यांबाबत बोलत नाही. कुणी तरी आपल्यात प्रवेश केला म्हणून टीका करतात.  पालघर मधील साधू हत्याकांड बाबत प्रमुख आरोपी भाजप मध्ये का घेतला ते आधी सांगा मग आम्हाला प्रश्न विचारा. बदल घडवायचा असेल तर चिन्ह मशाल आहे,” असंही ते म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!