Homeमनोरंजनसलमान खान त्याच्या 60 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चित्रकार झाला आहे

सलमान खान त्याच्या 60 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चित्रकार झाला आहे


सलमान खानचा वाढदिवस: सलमान खान 27 डिसेंबर रोजी आपला 60 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या खास निमित्ताने भाईजानने चाहत्यांसोबत एक खास व्हिडीओ शेअर केला असून यात तो पेंटरच्या भूमिकेत दिसत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सलमानने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, ‘एक पेंटिंग… एक सेलिब्रेशन, जे खरंच घडणार आहे. माझं एक्सक्लुसिव्ह आर्टवर्क ‘बीइंग ह्युमन’च्या क्लोदिंग पॉप-अप स्टोअरमध्ये अनुभवायला या.’ सलमानचा हा अनोखा अंदाज पाहून चाहते त्याला ‘आर्टिस्ट सलमान खान’ म्हणत कौतुक करत आहेत तर अनेक जण हार्ट इमोजी शेअर करत आपला आनंद व्यक्त करत आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान खान काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतो आहे. कॅनव्हासवर रंग भरताना तो खूपच मग्न झालेला दिसतो आणि आपल्या आर्टवर्ककडे पाहण्यासाठी ‘बीइंग ह्युमन’च्या पॉप-अप स्टोअरला भेट देण्याचं आवाहन करतो. सलमानचा हा वेगळा आणि शांत अंदाज चाहत्यांना विशेष भावला आहे.

सलमान खान वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सलमान खान शेवटचा ‘सिकंदर’ या चित्रपटात दिसला होता. जो बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. मात्र, आर्यन खानच्या दिग्दर्शनातील डेब्यू वेबसीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये सलमानचा खास कॅमिओ पाहायला मिळाला. याशिवाय त्याने ‘बिग बॉस 19’चं होस्टिंग केलं होतं. ज्याचा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर रोजी पार पडला असून, गौरव खन्ना या सीझनचा विजेता ठरला.

आगामी प्रोजेक्ट्सबाबत सांगायचं झालं तर सलमान खान लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत चित्रांगदा सिंह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित ही कथा आहे.

सीमा वादातून उभ्या राहिलेल्या या घटनेत दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शस्त्रांशिवाय लाठ्या आणि दगडांनी झटापट झाली होती. या देशभक्तीपर चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून, या भूमिकेत सलमान खानला पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सलमान खानचा 60 वा वाढदिवस कधी आहे?

सलमान खान 27 डिसेंबर रोजी आपला 60 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय खास आहे?

या व्हिडीओमध्ये सलमान खान पेंटरच्या भूमिकेत दिसतो असून, तो स्वतःचं आर्टवर्क साकारताना पाहायला मिळतो.

सलमान खानचं आर्टवर्क कुठे पाहता येईल?

सलमानचं एक्सक्लुसिव्ह आर्टवर्क ‘बीइंग ह्युमन’च्या क्लोदिंग पॉप- अप स्टोअरमध्ये पाहायला मिळणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!