Homeमहाराष्ट्रअजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार शरद पवार ठाकरे ठाकरे सोबत...

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार शरद पवार ठाकरे ठाकरे सोबत काँग्रेस काँग्रेस सोबत महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित गोंधळ


महाराष्ट्राचे राजकारण: नुकत्याच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यानंतर आता महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळात गोंधळ पहायला मिळत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांसोबत, शरद पवार ठाकरेंसोबत,  ठाकरे काँग्रेसोबत, काँग्रेस वंचित सोबत.. नेमकं कोण कोणासबोत युती आणि आघाडी करणार यात रोज नवनवीन ट्विस्ट येत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनची आघाडी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेच्या आघाडीवर  शिक्का मोर्तब झाले आहे.  कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना एकत्र लढविणार आहे.  काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अरुणभाई दूधवाडकर यांची संयुक्त पत्रकार बैठकीत निर्णय जाहीर केला. ठाकरे शिवसेनेला 12 जागा देण्यावर एकमत आहे.  81 पैकी 12 जागेवर ठाकरे शिवसेनेचे समाधान.

कॉंग्रेस रासप आघाडीची घोषणा

काँग्रेस आणि राष्ट्रीय समज पक्षाची महापालिका निवडणुकीसाठी आघाडी जाहीर झाली आहे. अध्यक्ष महादेव जानकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची चर्चा  झाली आहे.  नांदेड, परभणी, पुणे येथे निवडणूक एकत्रित लढवणार आहे.  राष्ट्रीय समज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.
नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती फिस्कटल्याचे जवळपास निश्चित आहे.  शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे भाजपची सर्व 122 जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण केली आहे.  शिवसेना शिंदे गटाची 50 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची 30 जागांची मागणी भाजपला अमान्य आहे.

अजित दादांच्या राष्ट्रवादी सोबत युती करण्यास काँग्रेस हायकमांडचा स्पष्ट नकार

पुणे मनपात अजित दादांच्या राष्ट्रवादी सोबत युती करण्यास काँग्रेस हायकमांडचा स्पष्ट नकार आहे. भाजपसोबत सत्तेत बसलेल्या दादांसोबत उघड युती अजिबात चालणार नाही. काँग्रेस हायकमांडने युतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना फटकारलं आहे.  महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

नवी मुंबईमध्ये महायुतीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युतीची चर्चा

नवी मुंबईमध्ये महायुतीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात आज दुसरी बैठक पार पडतेय. भाजपने शिवसेनेला फक्त 20 जागांचा प्रस्ताव दिलाय. त्यामुळे जागा वाटपावरून युती फिस्कटण्याची शक्यता आहे..भाजपला 91 जागा आणि शिवसेनेला 20 जागा देण्याचा प्रस्ताव भाजपकडून आहे. या बैठकीला शिवसेना खासदार नरेश म्हस्के ,उपनेते विजय नाहटा, भाजप आमदार मंदा म्हात्रे , विक्रांत पाटील , भाजप जिल्हाप्रमुख डॉ राजेश पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!