Homeमनोरंजनजयपूर प्रकरणाशी संबंधित आरसीबी यश दयाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

जयपूर प्रकरणाशी संबंधित आरसीबी यश दयाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला


यश दयाल: आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळणारा उत्तर प्रदेशचा गोलंदाज यश दयालला (Yash Dayal) न्यायालयाने मोठा झटका दिलेला आहे. जयपूरमध्ये (Jaipur) एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या केसमध्ये यश दयालला मोठा धक्का बसला आहे. कोर्टने यश दयालच्या अटकपूर्व जामीनाची याचिका रद्द केली असून न्यायालयाने सांगितलं की प्रकरण पाहून असं अजिबात वाटत नाही की आरोपीला चुकीच्या पद्धतीने या सगळ्यात गोवलं गेलंय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

जुलै महिन्यात नोंदवला होता FIR :

जुलै महिन्यात यश दयाल विरुद्ध FIR दाखल करण्यात आली होती. जयपूर आणि गाझियाबाद अशा दोन ठिकाणावरील महिलांनी यशवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते, आणि त्यानंतर पासून यश दयाल हा क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. जयपूरच्या सांगानेर पोलीस स्थानकात यश दयालवर एफआयआर दाखल करण्यात आली होती. एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला.  याच प्रकरणी यशने अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता मात्र जयपूर महानगर प्रथम विभागाच्या पोक्सो न्यायालय क्रमांक 3 ने यश दयालचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यश दयालला आता तुरुंगात जावे लागेल असे नाही, कारण त्याच्याकडे अजूनही उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे.

हॉटेलमध्ये बोलावून केला बलात्कार :

जयपूर पोलिसांच्या सांगण्यानुसार यश दयाल जेव्हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना खेळण्यासाठी जयपूरमध्ये आला होता तेव्हा त्याने पीडित मुलीला सीतापूर जवळील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. खूप काळ गप्प राहणं, इमोशनल ब्लॅकमेल आणि शारीरिक आणि मानसिक छळानंतर पीडितेने 23 जुलै 2025 रोजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. जयपूर पोलिसांच्या माहितीनुसार जेव्हा बलात्काराची पहिली घटना जेव्हा घडली तेव्हा पीडित मुलगी 17 वर्षांची होती. त्यामुळे यश दयालवर POCSO कायद्या 2012 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. जर यात यश दयाल दोषी आढळल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील.  POCSO कायद्या 2012 अंतर्गत जर यशवरील आरोप सिद्ध झाले तर त्याला भरपूर वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

रिपोर्ट्सनुसार यश दयालने अल्पवयीन मुलीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये  सुवर्ण भविष्याचे स्वप्न दाखवले आणि दोन वर्ष तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सांगानेर सदर पोलीस ठाण्याचे SHO अनिल जैमनने सांगितले की, पीडित मुलगी ही क्रिकेटच्या माध्यमातून यश दयालच्या संपर्कात आली होती. असा आरोप केला जातो की जेव्हा पीडित व्यक्ती सुमारे दोन वर्षांपूर्वी लहान होती, तेव्हा यश दयालने क्रिकेट कारकीर्द बनविण्यात मदत करण्याचे नाटक करून दोन वर्षे वारंवार बलात्कार केला. अहवालात आयपीएल 2025 शी संबंधित असल्याचेही नमूद केले आहे.

हेही वाचा : दो भाई दोनो तबाही…. विजय हजारे ट्रॉफीत रोहित विराटची शतकीय कामगिरी, ठोकलं 58 वं शतक

गाझियाबादमध्ये सुद्धा यश विरोधात तक्रार :

जुलै महिन्यात गाझियाबादमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर याबाबत तक्रार दाखल केली आहे. इंदिरापूरम सर्कल ऑफिसरकडे याची अधिकृत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, पीडितेने 14 जून 2025 रोजी महिला हेल्पलाइन क्रमांक 181 वरही संपर्क साधला होता अशी माहिती आहे. मात्र त्यावेळी स्थानिक पोलीस ठाण्यातून पुढील कारवाई झाली नव्हती, असंही तिने सांगितलं आहे. एफआयआरमध्ये पीडित महिलेने स्पष्ट केलं आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या काळात त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. तिने यशविरोधात व्हिडिओ कॉल्स, चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि फोटो यासारखे पुरावे सादर केले आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!