Homeमनोरंजनचीनची प्रेरणादायी कथा, चायनीज फूड डिलिव्हरी बॉयने दिवसाचे 13 तास काम करून...

चीनची प्रेरणादायी कथा, चायनीज फूड डिलिव्हरी बॉयने दिवसाचे 13 तास काम करून 5 वर्षांत 1 कोटी 42 लाखांची बचत केली


फूड डिलिव्हरी बॉयची प्रेरणादायी कथा: फूड डिलिव्हरी बॉयची कमाई किती असेल असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. अनेक सोशल मिडिया अकाऊंटवरुन या प्रश्नावर चर्चा करताना काही हजारांपासून ते लाखोपर्यंतचे आकडे सांगितलं जातात. मात्र एका फूड डिलिव्हरी बॉयने कोट्यवधींची संपत्ती आपल्या कामातून कमवली आहे. या डिलिव्हरी बॉयची सध्या सगळीकडे चर्चा असून त्याने केलेल्या कामाचा आवाका पाहून अनेकजण थक्क झालेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोण आहे हा डिलेव्हरी बॉय?

हा फूड डिलिव्हरी बॉय चीनमधील आहे. त्याने ठराविक तासांपेक्षा अधिक तास काम करुन, किमान गरजांवर अवलंबून राहणारी लाईफस्टाइल अवलंबून अवघ्या पाच वर्षांमध्ये 1.12 दशलक्ष युआनची बचत केली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 1 कोटी 42 लाख रुपये इतकी होते. त्याने जमा केलेली ही रक्कम मोठी वाटत असली तरी यासाठी त्याने घेतलेलं कष्ट पाहिल्यावर चीनमधील स्थानिक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

आधी त्याच्यावर होतं कर्ज

‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाचवणारा हा डिलिव्हरी बॉय 25 वर्षांचा असून त्याचं नाव झांग झुएकियांग असं आहे. आपल्या मूळ गावी खाद्यपदार्थांच्या व्यवसायात नुकसान झालं झांग फुजियान प्रांतातील झांगझोऊ शहरात एका मित्रासोबत नाश्त्याचे दुकान चालवत होता. तो व्यवसाय बंद पडला, ज्यामुळे त्याच्यावर 50 हजार युआनचे (6 लाख 27 हजार रुपयांहून अधिक) कर्ज झाले. कर्जाचं ओझं डोक्यावर असताना झांगने नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. तो नोकरीच्या शोधात शांघायला स्थलांतरित झाला. 2020 मध्ये शांघायला राहायला आल्यानंतर तो येथे एका मोठ्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी तो काम करु लागला.

स्वत: शेअर केला व्हिडीओ

कामाला सुरुवात केल्यानंतर पाच वर्षांनी नोव्हेंबरच्या अखेरीस, झांगने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने पाच वर्षांत एकूण 1.4 दशलक्ष युआनची बचत केल्याचं सांगितलं. कर्ज फेडल्यानंतर आणि राहण्याच्या मूलभूत गरजांसाठी खर्च भागवल्यानंतर, त्याने 1.12 दशलक्ष युआन म्हणजेच 1 कोटी 42 लाख रुपये वाचवण्यात यश मिळवले, असे त्याने ‘शिनमिन इव्हनिंग न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “अतिशय मूलभूत दैनंदिन गरजांशिवाय माझा इतर कोणताही खर्च नाही,” असे झांगने अगदी अभिमानाने सांगितलं.

तो दिवसभरात किती तास काम करतो?

केवळ डिलिव्हरीच्या माध्यमातून दीड कोटी कमाई करताना झांगने अपार कष्ट केलेत. तो आठवड्यातून सातही दिवस वर्किंग असतो म्हणजेच काम करतो. दिवसातील 13 तास तो काम करतो. चिनमधील नवीन वर्षाच्या कालावधीतच तो वर्षातील मोजक्या दिवसांची सुट्टी घेतो. आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना झांगने, “मी दिवसातून सुमारे 13 तास आणि आठवड्यातून सातही दिवस काम करतो. खाणे आणि झोपणे वगळता, मी माझा सर्व वेळ ग्राहकांना फूड डिलिव्हर करण्यातच घालवतो,” असं सांगितलं.

कसा असतो त्याचा दिनक्रम?

झांगचा दिवस सामान्यपणे रोज सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरू होतो तो थेट दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजता संपतो. आपला उत्साह टिकवून ठेवण्यासाठी, झांग दररोज साडेआठ तास झोप होईल याची काळजी घेतो.

महिन्याला किती ऑर्डर डिलिव्हर करतो?

गेल्या काही वर्षांत, झांगने दर महिन्याला सरासरी 300 पेक्षा जास्त ऑर्डर डिलिव्हर केल्या आहेत. प्रत्येक डिलिव्हरीसाठी त्याला सुमारे 25 मिनिटांचा वेळ लागतो. या सर्व डिलिव्हरी करण्यासाठी झांगने तब्बल 3 लाख 24 किलोमीटरचं अंतर कापलं आहे.

मॅनेजरकडून कौतुक

झांगच्या समर्पणामुळे तो त्याच्या सहकाऱ्यांमध्येही प्रसिद्ध आहे. सहकारी त्याला ‘ग्रेट गॉड’ तसेच ‘ऑर्डर किंग’ या टोपणनावाने ओळखतात. शांघायच्या मिन्हँग जिल्ह्यातील डिलिव्हरी स्टेशनचे संचालक यान यांच्या नेतृत्वाखील झांग काम करतो. झांगबद्दल बोलताना, “तो कोणाशी फारसा बोलत नाही. फक्त फूड डिलेव्हर करण्याच्या कामात तो स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. मी त्याला कधीही निवांत चालताना पाहिलेले नाही; तो नेहमी धावतच असतो,” असं यान यांनी सांगितलं. “आमचं क्षेत्रच असं आहे की येथे एखादा कामगार अधिक मेहनत करून जास्त पैसे कमवू शकतो. झांग हे याचं एक दुर्मिळ आणि उत्तम उदाहरण आहे,” असं म्हणत यान यांनी झांगचं कौतुक केलं आहे.

पुन्हा उद्योजक होणार?

आता झांग त्याच्याकडे साचलेल्या पैशामधून पुन्हा उद्योगाकडे वळणार आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत शांघायमध्ये दोन नाश्त्याची दुकाने सुरु करण्याचा विचार करतोय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!