HomeमनोरंजनFact Check of Pakistan Cricketer Awarded Goat And Two Bottles Oil For...

Fact Check of Pakistan Cricketer Awarded Goat And Two Bottles Oil For Winning Player Of The Match Viral Video | एक बकरी अन् तेलाच्या दोन बाटल्या… पाकिस्तानच्या सामनावीराला हा कसला पुरस्कार? Video Viral


पाकिस्तानी क्रिकेटपटूला बकरी आणि दोन बाटल्या तेलाचा पुरस्कार सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कदाचित तुम्हीसुद्धा बघितला असेल. ज्यामध्ये पाकिस्तानमधील एका क्रिकेटपटूला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार दिला जातो. आता तुम्ही विचार कराल की मग यात काय नवल. पुरस्कार तर दिलाय. पण त्याला या पुरस्कारासोबत एक बकरा आणि दोन तेलाच्या बाटल्या देण्यात आल्याचं एका व्हिडीओत दिसून येत आहे.  असा दावा केला जात आहे की हे सगळं त्याला पुरस्कार म्हणून दिलं जात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी पाकिस्तान क्रिकेटची खिल्ली उडवली आहे. पण नक्की हा व्हिडीओ खरा आहे का? चला याचं सत्य (Fact Check) जाणून घेऊयात…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

गेल्या काही वर्षांत पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी घसरली असल्याने खेळाडूंवर आणि संघावर टीका करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. साधारणपणे क्रिकेटमध्ये ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरणाऱ्या खेळाडूला आकर्षक ट्रॉफी आणि मोठी रोख रक्कम दिली जाते. मात्र जर एखाद्या खेळाडूला या पुरस्कारासाठी बकरा आणि तेलाच्या बाटल्या मिळाल्या, असं सांगितलं तर कुणालाही ते खोटंच वाटेल. तरीही असा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या जर्सीत असलेला एक क्रिकेटपटू ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे येतो. त्याच्या समोर एक बकरा आणून उभा केला जातो आणि त्याला दोन तेलाच्या बाटल्याही दिल्या जातात. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरणाऱ्या खेळाडूला असाच पुरस्कार दिला जातो. मात्र ए तपासणीत हा व्हिडीओ बनावट असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)च्या मदतीने तयार करण्यात आला असून, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.

PSL मध्ये विचित्र भेटवस्तूंचे खरे किस्से

जरी हा व्हायरल व्हिडीओ खोटा असला, तरी पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळाडूंना कधी कधी अनोख्या भेटवस्तू मिळाल्याच्या घटना खऱ्या आहेत. कराची किंग्सकडून खेळणाऱ्या जेम्स विंसने मुल्तान सुलतान्सविरुद्ध शतक झळकावलं होतं. त्या कामगिरीसाठी त्याला पुरस्कार म्हणून हेअर ड्रायर देण्यात आला होता. त्याचप्रमाणे, कराची किंग्सचा ऑलराउंडर हसन अली याला सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रिमर गिफ्ट देण्यात आला होता. या घटना AI-निर्मित नव्हत्या, तर प्रत्यक्षात खेळाडूंना असे विचित्र पुरस्कार देण्यात आले होते.

म्हणजेच, बकरा आणि तेलाच्या बाटल्यांचा व्हिडीओ खोटा असला, तरी PSL मधील अजब भेटवस्तूंचे किस्से मात्र पूर्णपणे खरे आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान:विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी

0
पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानला देशाचे पाचवे राज्य बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुरुवारी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला...
spot_img

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
error: Content is protected !!