Homeमनोरंजनरणवीर सिंग अक्षय खन्ना धुरंधर चित्रपटाने इंग्लंडमध्ये 737 कमाई केली जबरदस्त व्यवसाय

रणवीर सिंग अक्षय खन्ना धुरंधर चित्रपटाने इंग्लंडमध्ये 737 कमाई केली जबरदस्त व्यवसाय


धुरंधर जागतिक संकलन दिवस 15: रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. जरी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची गती मर्यादित वाटत असली तरी परदेशात मात्र ‘धुरंधर’ने अक्षरशः वेगळीच झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, युकेसह अनेक परदेशी बाजारपेठांमध्ये हा चित्रपट जबरदस्त कमाई करताना दिसत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सिनेमागृहात प्रदर्शित होऊन या चित्रपटाला 15 दिवस पूर्ण झाले आहेत. ‘धुरंधर’ने परदेशात मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. विदेशात बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 700 कोटींचा टप्पा पार करत हा चित्रपट आता 800 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, विक्की कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाचा वर्ल्डवाइड लाइफटाइम कलेक्शनचा विक्रम मोडण्याच्या दिशेने ‘धुरंधर’ वेगाने वाटचाल करत आहे.

15 व्या दिवशीही जबरदस्त कमाई

‘धुरंधर’ने पहिल्याच दिवशी जगभरात 32 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर प्रत्येक दिवशी या चित्रपटाची कमाई वाढतच गेली. बुधवारी जगभरात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची एकूण कमाई 702 कोटी रुपये झाली होती.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी ‘धुरंधर’ने एकाच दिवशी सुमारे 35 कोटी रुपयांची कमाई केली. गेल्या 15 दिवसांपासून हा चित्रपट दररोज जगभरात 35 ते 40 कोटींच्या दरम्यान कमाई करत आहे. त्यामुळे अवघ्या दोन आठवड्यांतच चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 737.5 कोटी रुपये इतकं झालं आहे.

अमेरिकेत ‘धुरंधर’चा दबदबा

परदेशातील बाजारपेठांपैकी अमेरिका हा ‘धुरंधर’साठी सर्वात मजबूत मार्केट ठरत आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 12 डिसेंबरपर्यंतच 70 कोटींची कमाई केली होती. त्याचप्रमाणे, इंग्लंडमध्येही या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 14 कोटी रुपये कमावले आहेत.

फक्त परदेशी बॉक्स ऑफिसचा विचार केला तर ‘धुरंधर’ने विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘छावा’ने एकूण 91 कोटींची कमाई केली होती. मात्र, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ने अवघ्या 15 दिवसांपूर्वीच 158 कोटी रुपयांची विदेशात कमाई केली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) ‘धुरंधर’ चित्रपटाला रिलीज होऊन किती दिवस झाले आहेत?

‘धुरंधर’ चित्रपटाला सिनेमागृहात प्रदर्शित होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत.

2) ‘धुरंधर’ने आतापर्यंत वर्ल्डवाइड किती कमाई केली आहे?

आतापर्यंत ‘धुरंधर’ने जगभरात सुमारे ७३७.५ कोटी रुपयांची कमाई केली असून, हा सिनेमा ८०० कोटींच्या क्लबच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

3) देशांतर्गत आणि परदेशातील कमाईत काय फरक आहे?

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ची गती तुलनेने मर्यादित असली, तरी परदेशात या चित्रपटाने प्रचंड वेग घेतला आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युकेसारख्या देशांत चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!