Homeमनोरंजनind vs sa t20 5वा सामना भारताने 30 धावांनी जिंकून मालिका 3-1...

ind vs sa t20 5वा सामना भारताने 30 धावांनी जिंकून मालिका 3-1 ने जिंकली


IND VS SA T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील शेवटचा सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. दरम्यान टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करून 5 विकेट गमावून 231 धावांची कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 232 धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ अपयशी ठरला आणि भारताने 30 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने 3-1 ने आघाडी घेतली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यामुळे टीम इंडियाला आधी फलंदाजीसाठी उतरावे लागले. टीम इंडियाकडून सूर्यकुमार वगळल्यास जवळपास सर्व फलंदाजांनी आपल्या स्फोटक फलंदाजीने मैदानात गाजवलं. यात संजू सॅमसनने 37, अभिषेक शर्माने 34, तिलक वर्माने 73, हार्दिक पंड्याने 63, शिवम दुबेने 10 धावा केल्या. हार्दिक पंड्या (63) आणि तिलक वर्मा (73) या जोडीने मैदानात जम बसवला होता. दोघांनी दमदार अर्धशतक ठोकलं. यावेळी 14 व्या ओव्हरला या जोडीने फटकेबाजी करून तब्बल 27  धावा केल्या. हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार फलंदाजी करताना रेकॉर्ड सुद्धा रचला. त्याने 16 बॉलमध्ये 54 धावा करून अर्धशतक ठोकलं. त्यामुळे तो टी 20 मध्ये अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा खेळाडू ठरला.

टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करून 5 विकेट गमावून 231 धावांची कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 232 धावांचे आव्हान दिलं. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने 65 धावा केल्या. तर त्याच्या खालोखाल डेव्हिड ब्रेव्हिसने 31 धावांची कामगिरी केली. तर इतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. तर टीम इंडियाकडून व्यंकटेश अय्यरने 4 विकेट्स, जसप्रीत बुमराहने 2 आणि हार्दिक पंड्या तसेच अर्शदीपने 1 प्रत्येकी 1 विकेट घेतली. टीम इंडियाने 30 धावा राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळाला यासह सीरिज सुद्धा जिंकली. टीम इंडियाने यापूर्वी सीरिजमधील पहिल्या आणि तिसऱ्या टी २० सामन्यात विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर विजय मिळवला होता. मात्र पाचवा सामना जिंकून टीम इंडियाने सीरिजमध्ये 3-1 ने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा : सॅमसनच्या बॅटमधून निघालेल्या शॉटने अंपायर जखमी, वेदनेनं कळवळत जमिनीवर कोसळला, नेमकं काय घडलं?

एका ओव्हरमध्ये 27 धावा :

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी तुटल्यावर हार्दिक पंड्या (63) आणि तिलक वर्मा (73) या जोडीने मैदानात जम बसवला. दोघांनी दमदार अर्धशतक ठोकलं. यावेळी 14 व्या ओव्हरला या जोडीने फटकेबाजी करून तब्बल 27  धावा केल्या. यावेळी जॉर्ज लिंडे हा गोलंदाजी करत होता. 14व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर तिलक वर्माने षटकार ठोकला, मग दुसऱ्या बॉलवर त्याने सिंगल घेऊन हार्दिकला स्ट्राईक दिली. हार्दिक पंड्याने तिसऱ्या बॉलवर चौकार, लगावला, एवढंच नाही तर त्याने तिसऱ्या चौथ्या बॉलवर षटकार ठोकला आणि पाचव्या बॉलवर सुद्धा चौकार लगावला. हार्दिक पांड्याची ही फटकेबाजी पाहून सर्वच थक्क झाला.

दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक :

हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार फलंदाजी करताना रेकॉर्ड सुद्धा रचला. त्याने 16 बॉलमध्ये 54 धावा करून अर्धशतक ठोकलं. त्यामुळे तो टी 20 मध्ये अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा होता, ज्याने 17 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलेलं. तर हार्दिकच्या पुढे 12 बॉलमध्ये अर्धशतक करणारा हार्दिक पंड्या आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राहुल गांधींची डेहराडूनमध्ये 8 हजार विद्यार्थ्यांशी चर्चा:म्हणाले- 1% लोक पेपरफुटीच्या मार्गावर चालतात, यामुळे 99%...

0
डेहराडूनमधील बन्नू स्कूल ग्राउंडवर आयोजित काँग्रेसच्या 'विद्यार्थ्यांची गर्जना' कार्यक्रमात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, भरती व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य हे सर्वात...

17 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत...

0
शुक्रवार, 17 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते आणि व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या नोकरदार...

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...
spot_img

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...
error: Content is protected !!