Homeमनोरंजनind vs sa 5th t20 match know ahamadabad aqi level pollution level...

ind vs sa 5th t20 match know ahamadabad aqi level pollution level | किती आहे अहमदाबादचा AQI लेव्हल? भारत


IND VS SA 5वी T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज सुरु असून यातील शेवटचा टी 20 सामना शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. मात्र AQI लेव्हलमुळे या सामन्यावर सुद्धा रद्द होण्याचं संकट आहे. बुधवारी 17 डिसेंबर रोजी लखनऊ येथील एकना स्टेडियमवर होणारा सामना हा लखनऊमधील AQI लेव्हल बिघडल्यामुळे आणि स्टेडियमवर दाट धुकं पसरल्याने रद्द करण्यात आला. तेव्हा आता अहमदाबादचा AQI लेव्हल शुक्रवारी किती आहे याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

किती आहे अहमदाबादचा AQI लेव्हल?

अहमदाबाद येथील शेवटच्या सामन्याच्या हवामानापुर्वी चौथ्या टी 20 दरम्यान हार्दिक पंड्याच्या मास्क घातलेल्या फोटोची मोठी चर्चा झाली. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त होऊ लागली. सध्या भारतातील अनेक भागांमध्ये प्रदूषण ही एक समस्या बनली आहे. पण फक्त सामन्याच्या एका दिवशी अहमदाबादची स्थिती कंट्रोलमध्ये दिसून येतेय. अहमदाबाद शहराचा AQI हा ‘मध्यम’ पासून ‘संवेदनशील गटांसाठी अनारोग्यकारक’ या दरम्यान आहे.

18 रोजी अहमदाबादचा AQI हा जवळपास 139 एवढा होता. परंतु 19-20 डिसेंबर दरम्यान PM2.5 प्रदूषकांमुळे वाढ अपेक्षित आहे. बातमी लिहीत असेपर्यंत अहमदाबादचा AQI 174 होता, जो AQI.in ज्याला अस्वस्थ म्हणून वर्गीकृत करतो. असे असूनही दृष्टी प्रभावित होण्याची शक्यता कमी आहे आणि सामन्यात कोणताही व्यत्यय अपेक्षित नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे अहमदाबादच्या प्रदूषणाचा स्तर हा लखनऊपेक्षा खूपच नाही आहे. बुधवारी जेव्हा चौथ्या टी20 सामना खेळवला जाणार होता, तेव्हा लखनऊचं AQI लेव्हल ही जवळपास 490 पर्यंत होती. ज्यामुळे समोर काहीही दृश्यमान नव्हतं आणि त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. अहमदाबाद येथील AQI लेव्हल हा खराब असला तरी त्याचा टी20 सामन्यावर कोणताही प्रभाव पडणार आहे.

हेही वाचा : हा काय प्रकार?…. एअरपोर्टवर एमएस धोनीची चेकिंग करताना घडला ‘हा’ प्रकार, नेटकऱ्यांनी केली टीका Video Viral

कुठे पाहाल सामना?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा टी 20 सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता होणार आहे तर 6: 30 वाजता टॉस पार पडेल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर तर मोबाईल यूजर्सना जिओस्टारवर पाहता येईल.

भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्ंधर), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (डब्ल्यूके), संजू सॅमसन (डब्ल्यूके), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, हर्षित राणा.

दक्षिण आफ्रिका संघ :

एडन मार्कराम (कर्ंधर), डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जॉर्झी, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॉन्सन, क्विंटन डी कॉक (डब्ल्यूके), डोनोव्हन फरेरा (डब्ल्यूके), ट्रिस्टन स्टब्स, ओटनीएल बार्टमन, केशव महाराज, क्वेना नॉर्गीका, एनजी माफिया, एन.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!