Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणिकराव कोकाटे यांचा क्रीडा मंत्रालयाचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणिकराव कोकाटे यांचा क्रीडा मंत्रालयाचा राजीनामा


माणिकराव कोकाटे यांच्यावर देवेंद्र फडणवीस : माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्विकारत राज्यपालांकडे सुपूर्द केला. राज्यपालांनाही हा राजीनामा स्विकारला आहे. माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र माणिकराव कोकाटे उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना अटक कऱण्यासाठी डॉक्टरांकडून हिरवा कंदील मिळण्याची वाट पाहिली जात आहे. यादरम्यान माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

“माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या खात्यांची जबाबदारी अजित पवारांकडे सोपवण्यात आली आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

बिबटे पकडण्यासाठी रेस्क्यू सेंटर्स

मिरा भाईंदरमध्ये बिबट्या दिसल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “माहिती मिळताच तिथे टीम पोहोचली. हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहे. म्हणून आता आपण रेस्क्यू सेंटर्स मोठ्या प्रमाणात उभारण्याचं काम सुरु केलं आहे. बिबटेही आपण पकडत आहोत. रेस्क्यू सेंटर्स उभारुन बिबटे तिथे सोडणं महत्त्वाचं असून, त्यादृष्टीने काम सुरु आहे”.

‘दोन दिवसांत जागावाटप अंतिम होईल’

महायुतीचं जागावाटप चांगल्या पद्धतीने सुरु आहे. दोन्ही पक्षांचे नेते महायुतीचं नीट जागावाटप करत आहेत. दोन दिवसांत ते पूर्ण होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

‘ड्र्ग्ज प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव’

दरम्यान महाबळेश्वर परिसरात 145 कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता त्याच्यात एकनाथ शिंदेंचं नाव आणणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!