Homeमहाराष्ट्रKeep your voice pious, God will not accept you without it -...

Keep your voice pious, God will not accept you without it – Devotees’ response to Akhand Harinam Week at Khole, Pishore | वाणी पुण्यवंत ठेवा, परमात्मा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही- खोले: पिशोर येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांचा प्रतिसाद‎ – Chhatrapati Sambhajinagar News

प्रेमाशिवाय जगात दुसरे काहीही श्रेष्ठ नाही. प्रेमाने बोला, कुणालाही वाईट शब्दाने दुखवू नका. एक दिवस पांडुरंगालाही तुमचा स्वीकार करावा लागेल, असे प्रतिपादन खोले महाराज यांनी केले. पिशोर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात १७ डिसेंबर रोजी चौथ्या पु

.

खोले महाराज म्हणाले, आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारत आहोत. मुलांच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. त्यामुळे त्यांचे संसार सुखाचे होतील. त्यांची मुलेबाळे कीर्तिवंत होतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

तुकाराम महाराज आयुष्यात कधीही कुणाबद्दल वाईट बोलले नाही. समाजाच्या हिताचेच बोलत राहिले. म्हणून त्यांना स्वामी सद्गुरू धामा सच्चिदानंद मूर्ती ही पदवी मिळाली. ज्या घरात माऊली व तुकाराम महाराजांचे विचार नाहीत, त्या घरात चिडचिड व वाईट विचार वाढतात. गळ्यात तुळशीची माळ घाला. व्यसनांना तिलांजली द्या, असे आवाहन त्यांनी केले.

खोले महाराज म्हणाले, माझ्या विठ्ठलाचं चित्र डोळ्यासमोर उभं करा. निवृत्ती दादा खांद्यावर, ज्ञानेश्वर माऊली पुढे, मुक्ताई मागे, सोपानचा हात धरलेला, गोरा कुंभार मांडीवर, चोखा जीवा बरोबर, वंका कडेवरी, नामा करंगळी दरी, जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा. विठ्ठलच सर्व रोगांवरचा वैद्यराज आहे.

या वेळी पंचकमिटीचे सचिव हभप धोंडू महाराज मोकासे, पारावरची पोरं मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हभप भानुदास महाराज सुरडकर यांनी खोले महाराजांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.

वीणेकरी सोपान महाराज मोकासे, गायनाचार्य एकनाथ महाराज शेलार, राजू महाराज मोकासे, रामदास महाराज मोकासे, शांताराम महाराज ओपळकर, चंद्रभान महाराज नवले, नंदू सुरळकर, गोविंद सुरडकर, वासुदेव महाराज राठोड यांच्यासह वासडी, करंजखेड, नागपूर, चिंचोली, नेवपूर, नाचनवेल, सारोळा, जवखेड, गोरपिंपरी, नादरपूर, पिंपरखेड, वासडी, रामनगर, हस्ता, मेहेगाव, तपोवन, भारंबा तांडा, श्रीकृष्ण वाडी आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आई-वडिलांचे ऋण विसरू नका, नियमित सेवा करा गर्भात असताना नऊ महिने नऊ दिवस सांभाळून पांडुरंग आपल्याला सुखरूप जग दाखवतो. जी आई लहानाचे मोठे करते, तिचे ऋण विसरू नका. ज्या घरात माऊली व तुकाराम महाराजांचे विचार नाहीत, त्या घरात चिडचिड व वाईट विचार वाढतात. गळ्यात तुळशीची माळ घाला. आई-वडिलांसारखे दुसरे दैवत नाही, असेही खोले महाराजांनी स्पष्ट केले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!