Homeमहाराष्ट्रAchalpur Mayor results after 20 rounds | अचलपूर नगराध्यक्ष निकाल 20 फेऱ्यांनंतर:...

Achalpur Mayor results after 20 rounds | अचलपूर नगराध्यक्ष निकाल 20 फेऱ्यांनंतर: नांदगाव, धामणगाव, शेंदुरजनाघाटचे निकाल तिसऱ्या फेरीत स्पष्ट – Amravati News

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा निकाल २० व्या फेरीनंतर दुपारी ३ वाजेपर्यंत अपेक्षित आहे. याउलट, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे आणि शेंदुरजनाघाट येथील नगराध्यक्षांचे निकाल अवघ्या तीन फेऱ्यांमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट

.

जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी झाल्या होत्या, तर अंजनगाव सुर्जी नगरपालिकेची निवडणूक २० डिसेंबरला पार पडली. सर्व १२ नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित होणार आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

अचलपूर ही जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असून, येथे सर्वाधिक ३९ नगरसेवक आहेत. मतमोजणीचा क्रम नगरसेवक आधी आणि नगराध्यक्ष नंतर असा ठरवण्यात आला आहे. प्रत्येक फेरीअखेर दोन नगरसेवकांचा निकाल जाहीर होईल, ज्यामुळे २० व्या फेरीनंतर सर्व ३९ नगरसेवकांची घोषणा होईल आणि त्यानंतर नगराध्यक्षपदाचा निकाल स्पष्ट होईल.

जिल्हा प्रशासनाच्या तयारीनुसार, चांदूर रेल्वेचा निकाल दुपारी २ च्या सुमारास ८ फेऱ्यांनंतर घोषित होईल. दर्यापूरमध्ये सातव्या फेरीअखेर, तर अंजनगाव सुर्जी आणि चांदूरबाजार येथे सहाव्या फेरीअखेर निकाल अपेक्षित आहे. धारणी व चिखलदरा येथे पाचव्या फेरीअखेर, तर मोर्शी व वरुड येथे चौथ्या फेरीअखेर नवे नगरसेवक आणि नगराध्यक्ष स्पष्ट होतील.

मतमोजणीसाठी तीन ठिकाणी नगरपालिका कार्यालये आणि चार ठिकाणी तहसील कार्यालये निवडण्यात आली आहेत. नांदगाव खंडेश्वर येथील मतमोजणी शासकीय आयटीआयमध्ये होणार असून, अचलपूरची मतमोजणी कल्याण मंडपम येथे केली जाईल.

चिखलदरा येथे मतमोजणीसाठी सर्वात कमी म्हणजे केवळ दोन टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या संख्येनुसार ही व्यवस्था करण्यात आली असून, एका फेरीत दोन ईव्हीएममधील मतांची नोंदणी होईल. पाच फेऱ्यांनंतर येथील नगराध्यक्षांचा निकाल कळेल.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!