Homeमनोरंजनमारुती सुझुकी स्विव्हल सीट वृद्ध आणि अपंगांसाठी फायदेशीर मराठी बातम्या

मारुती सुझुकी स्विव्हल सीट वृद्ध आणि अपंगांसाठी फायदेशीर मराठी बातम्या


मारुती सुझुकी: कार चालवणं प्रत्येकालाच आवडत. पण ज्येष्ठ नागरिक, वृद्धांना कार चालवताना,त्यात बसताना किंवा बाहेर उतरताना अनेक अडचणी  येतात. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण मारुति सुजुकीने वृद्ध, अपंगांना खास गिफ्ट दिलंय. मारुतीने आपल्या लोकप्रिय WagonR कारमध्ये स्विव्हल सीटचा नवा पर्याय आणलाय. ही विशेष सीट ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी तयार केलीय. ज्यामुळे कारमध्ये बसणे आणि उतरणे खूप सोपे होते. काय आहे ही सुविधा? सोप्या भाषेत समजून घ्या.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ज्यांना हालचाल करण्यात अडचण येते, त्यांना प्रवासात आराम मिळावा आणि सर्वांना समावेशक गतिशीलता उपलब्ध व्हावी, हा कंपनीचा हेतू आहे. WagonR ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे, आणि या फीचरमुळे दिव्यांगांसाठी सोयीस्कर वाहने मुख्य प्रवाहात येणार आहेत. सध्या हे 11 शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झाला असून 200 पेक्षा जास्त ARENA डीलरशिपवर उपलब्ध आहे. ग्राहकांच्या प्रतिसादानुसार ते इतर शहरांमध्ये वाढवले जाणार आहे.

स्विव्हल सीट कशी काम करते?

दरवाजा उघडताच ती बाहेरच्या दिशेने फिरते आणि प्रवाशाला सरळ बसता येते. जास्त वाकण्याची गरज लागत नाही. बसल्यावर सीट आपोआप आत फिरून लॉक होते. हे विशेषतः गुडघे, कंबर किंवा पायांच्या समस्यां असलेल्यांसाठी उपयुक्त आहे. ही सुविधा बुजुर्गांना आणि दिव्यांगांना रोजच्या प्रवासात मोठा दिलासा देणारे ठरणार आहे. कारण कारमध्ये चढ उतार होणे सोपे आणि सुरक्षित होईल.

इंस्टॉलेशन

ही सीट लावण्यासाठी कारच्या मूळ सीटमध्ये बदल करण्याची गरज नाही. फक्त एक तासात डीलरशिपवर बसवली जाते. कारच्या बॉडी किंवा रचनेत कोणताही बदल होत नाही. उत्पादनात दोष असल्यास तीन वर्षांची वॉरंटी मिळते. नवीन WagonR घेताना हा पर्याय घेता येणार आहे. तसेच जुनी WagonR असल्यास रेट्रोफिट किट लावून ही सुविधा मिळवता येईल. मारुति सुजुकी ARENA डीलरशिपवर ही सोय उपलब्ध आहे.

सुरक्षेची काळजी

ही स्विव्हल सीट किट ARAI (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) कडून पूर्णपणे तपासली गेली आहे आणि सर्व सुरक्षा मानकांवर उतरली आहे. फिटिंगनंतर कारची सुरक्षा किंवा कामगिरीवर कसलाही परिणाम होत नाही. ही सुविधा बेंगलुरुच्या TRUEAssist Technology या स्टार्टअपच्या मदतीने विकसित केलीय. ही स्टार्टअप IIM बेंगलुरुच्या इनक्यूबेशन प्रोग्रॅममध्ये आहे आणि भारतीय रस्ते व ग्राहकांच्या गरजेनुसार डिझाइन केल्याची माहिती देण्यात आली.

कंपनीने काय म्हटलं?

हे फीचर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या दैनंदिन जीवनात मोठी मदत करेल. WagonR सारख्या लोकप्रिय कारमध्ये हे जोडून कंपनी समावेशक मोबिलिटीला प्रोत्साहन देत असल्याची माहिती मारुति सुझुकीचे एमडी आणि सीईओ हिशाशी ताकेउची यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी झाल्यास इतर मॉडेल्समध्येही अशा सुविधा येऊ शकतात. एकंदरीत मारुति सुझुकीने हे पाऊल उचलून समाजातील विशेष गरजा असलेल्या लोकांना कार प्रवास अधिक सोपा आणि आनंददायी बनवल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!