Homeमहाराष्ट्रSolapur Sushma Andhare Kala Kendra Row; Shinde Group Links Chhamchham Allegations |...

Solapur Sushma Andhare Kala Kendra Row; Shinde Group Links Chhamchham Allegations | शिंदे गटाने सुषमा अंधारेंचा संबंध कुंटणखान्याशी जोडला: बीडच्या कला केंद्रातील छमछमशी तुमचा काय संबंध? असा केला सवाल; वाद पेटणार – Maharashtra News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा ड्रग्ज प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या सुषमा अंधारेंवर शिंदे गटाने जोरदार पलटवार केला आहे. या प्रकरणी शिंदे गटाने सुषा अंधारेंचा संबंध बीडमधील एका कुंटणखान्याच्या मालकाशी जोडला आहे. कला केंद्रात सुरू अ

.

सुषमा अंधारे यांनी सातारा ड्रग्ज रॅकेट प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर पलटवार केला आहे. या प्रकरणी त्यांनी अंधारेंचा शुर्पणखा असा केला. त्या म्हणाल्या, कालपासून एका शूर्पणखेने गोंधळ घातला आहे. शूर्पणखेने रामायणातही राम व लक्ष्मणावर खोटे आरोप केले होते. त्यानुसार, सुषमा अंधारे यांनी कॅमेऱ्याचा फोकस स्वतःकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंवर धादांत खोटे आरोप केले.

पत्र्याच्या शेडचा अन् रिसॉर्टचा संबंध नाही

शाकाहारी लोक भाजीपाल्यावर जगतात, मांसाहारी लोक इतर काही खातात, पण कॅमेराजिवी लोकांनी 2-3 दिवस कॅमेऱ्यावर दिसले नाही की ते काहीतरी फालतू आरोप करतात. त्यानुसार सुषमा अंधारे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची बदनामी करण्यासाठी त्यांच्यावर आरोप केलेत. साताऱ्याच्या धाड सावरी गावात धाड पडली. तेथील पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज सापडले. तिकडे एक रिसॉर्ट आहे. रिसॉर्टचा व पत्र्याच्या शेडचा काही संबंध नाही. ती जागा गोविंद शिरकर यांच्या मालकीची होती. ओंकार डिगे तिथे काम करत होता. ड्रग्ज पत्राच्या शेडमध्ये सापडले होते. त्याचा व रिसॉर्टचा कोणताही संबंध नाही. सुषमा अंधारे यांनीच यापूर्वी सांगितले होते, असे त्या म्हणाल्या.

एकनाथ शिंदेंची नाहक बदनामी सुरू

वाघमारे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये ड्रग्जचा साठा आढळल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप धादांत खोटा आहे. प्रकाश शिंदे यांनी आपण हे रिसॉर्ट भाड्याने चालवण्यास दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी सुषमा अंधारे चिखलफेक करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता त्यांना भीक घालणार नाही, असे त्या म्हणाल्यात.

सुषमा अंधारे अन् रत्नाकर शिदेंचा काय संबंध?

वाघमारे म्हणाल्या, सुषमा अंधारे यांनी त्यांचा व बीडचा ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यात काय संबंध आहेत? हे स्पष्ट करावे. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रत्नाकर शिंदे यांच्या कलाकेंद्रावर छापा टाकला होता. त्यात मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलींना अवैध व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे दिसून आले होते. सुषमा अंधारे यांच्या पुढाकारने रत्नाकर शिंदेचा ठाकरे गटात प्रवेश झाला. त्याच्यावर एवढे गंभीर आरोप होऊनही तो जामिनावर सुटला. कुंटणखाना चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेला पुन्हा जिल्हाप्रमुख करण्यासाठी कुणी शिफारस केली होती हे सुषमा अंधारेंनी सांगावे.

कला केंद्रातील छमछमशी काय संबंध?

अंजली दमानिया यांनी सदर कलाकेंद्रावर टाकण्यात आलेल्या छाप्याचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यात आरोपी असलेल्यांची नावे सत्वशीला बाबासाहेब अंधारे, आदित्य अंधारे, मयूर अंधारे अशी होती. या सगळ्यांचे सुषमा अंधारेंशी काय कनेक्शन आहे? बीडच्या या कला केंद्रात नाचणाऱ्या अनेक मुलींची आडनावे अंधारे का आहेत? या कला केंद्राच्या छमछमशी तुमचा काय संबंध आहे? तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे रत्नाकर शिंदे यांच्या नावाची शिफारस का करता? असा सवालही ज्योती वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांना विचारला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!