Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 हिंगोलीचे राजकारण प्रज्ञा राजीव सातव यांनी...

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 हिंगोलीचे राजकारण प्रज्ञा राजीव सातव यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा


प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये का प्रवेश केला याबद्दल काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रज्ञा सातव यांनी विधानभवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या कार्यालयात जाणून पक्षात प्रवेश केला. विद्यमान विरोधीपक्ष नेते राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीने अशाप्रकारे काँग्रेसची साथ सोडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच प्रज्ञा यांनी स्वत: काँग्रसेला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश का केला हे सांगितलं.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सज्जन व्यक्ती कसा असावा तर राजीव सातवांसारखा

बावनकुळे यांनी प्रज्ञा सातव यांचं भाजपामध्ये स्वागत करताना, त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देताना कोणाबद्दलही नाराजी व्यक्त केली नसल्याचा उल्लेख आवर्जून केला. “हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी राजीव सातव यांनी आपलं आयुष्य वेचलं. सज्जन व्यक्ती कसा असावा तर राजीव सातव यांच्यासारखा! आज राजीव सातव आपल्यात नाहीत. प्रज्ञा ताईंनी राजीव सातव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. विधान परिषदेत त्या आमदार झाल्यात. हिंगोली विकासापासून दूर राहून चालणार नाही. हिंगोलीच्या विकासासाठी प्रज्ञा ताईंचा संकल्प आहे. प्रज्ञा सातव यांनी राजीनामा देताना कुणावरही नाराजी व्यक्त केली नाही. हिंगोलीला विकसित करायचा हा संकल्प प्रज्ञा ताई यांनी मांडला,” असं बावनकुळे प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावेळी म्हणाले.

नक्की वाचा >> BMC Election: मुंबईत मराठी माणूस कोणाच्या बाजूने? ठाकरे की शिंदे? थक्क करणारे आकडे समोर

काँग्रेस सोडण्याचं कारण प्रज्ञा सातव यांनीच सांगितलं

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसहीत भाजपाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रज्ञा सातव यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडण्यामागील कारणाबद्दल भाष्य केलं आहे. “माझे पती सर्वांचे लाडके खासदार राजीव सातव यांनी हिंगोलीसाठी काम केले. 2021 मध्ये मी विधान परिषदेत आमदार झाले. माझ्या कार्यकर्त्यामुळे मी आज खंबीरपणे उभी राहिली आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वात राज्याचा जो विकास होत आहे त्यामध्ये आम्हाला देखील साथ द्यायची आहे. आमच्या गावाकडे या, तारीख द्या! आपण कार्यक्रम घेऊन मोठा पक्ष प्रवेश करून घेऊ,” असं प्रज्ञा सातव भाजपा नेत्यांना आवाहन करताना म्हटलं. प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा फायदा तर काँग्रेसला फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> 5 गाड्या, 7 घरं, 26 एकर जमीन तरी शासकीय घरासाठी ‘उल्प उत्पन्न गटात’ सांगणाऱ्या कोकाटेंची खरी संपत्ती किती?

प्रज्ञा सातव यांचा अल्पपरिचय

प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, हिंगोलीचे माजी खासदार (2014-2019) आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय होते. त्यांनी युवक काँग्रेसचे राज्याध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस, गुजरात प्रभारी आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य अशी पदे भूषवली होती. राजीव सातव यांचे 2021 मध्ये आजाराने निधन झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून प्रज्ञा सातव यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली. प्रज्ञा सातव ओबीसी समुदायातून येतात आणि हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या कुटुंबाची राजकीय पकड आहे. त्यांच्या सासू राजनी सातव या काँग्रेस सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री होत्या. आता त्या भाजपकडून कलमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!