Homeमहाराष्ट्रगुरुचे उद्या नाशिक ते नमोकार तीर्थ या ५० किमीच्या यात्रेतून होणार स्वागत,...

गुरुचे उद्या नाशिक ते नमोकार तीर्थ या ५० किमीच्या यात्रेतून होणार स्वागत, तीर्थ समितीच्यावतीने मालसणे येथील नमोकार तीर्थ जीवनानिमित्त आयोजित, देशात प्रथमच तीन दिवसीय स्वागत तीर्थयात्रा | नाशिक ते नमोकार तीर्थ पर्यंत ५० किमी पर्यंत उदय होनार गुरुंचे स्वागत : मालसाणे येठे नमोकार तिर्थाच्या प्राणप्रतिष्ठे तीर्थ समिती तीर्थ समिती तीर्थ समिती – नाशिक न्यूज


.

उमराणे, नाशिक चांदवड तालुक्यातील मालसाने येथे नव्याने उभारलेल्या णमोकार तीर्थाची प्राणप्रतिष्ठा तसेच महामस्तकाभिषेक महोत्सव ६ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून ४०० पेक्षा जास्त दिगंबर जैन साधू पदविहार करून येथे पोहोचत आहेत. त्यासाठी मुंबई येथील चातुर्मास करून युगलमुनीश्री अमोघकीर्तीजी व मुनीश्री अमरकीर्तीजी गुरुदेव नाशकातून पदविहार करीत णमोकार तीर्थ येथे पोहचत आहे. त्यांच्यासाठी नाशिक ते णमोकार तीर्थ अशी ५० किलोमीटरची स्वागत यात्रा शुक्रवारी (दि. १९) काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जैन धर्मात एवढी मोठी स्वागत यात्रा पहिल्यांदाच काढण्यात येणार आहे. णमोकार तीर्थ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव समितीतर्फे युगल मुनीश्रींचे भव्य स्वागत अनोख्या पध्दतीने करण्यात येणार आहे. ही स्वागत यात्रा आडगाव येथून शुक्रवारी (दि. १९) सुरू होऊन २१ ला रोजी णमोकार तीर्थ येथे समाप्त होणार आहे. या यात्रेच्या ५० किमीच्या मार्गात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात येईल. १०८ फूट लांब धर्मध्वजा, गुरुरथ, चालता फिरता मंडप, युवाइंद्रसहित अनेक गोष्टींचा सहभाग असेल. ठिकठिकाणी नाशिकची कला, संस्कृती दाखविणारे विविध प्रकारचे भक्तिनृत्यही सादर होणार आहे.जैन समाजाच्या परंपरेप्रमाणे १ ते२ किमीची स्वागत यात्रा काढली जाते, परंतु पहिल्यांदाच ५० किमी लांब स्वागत यात्रा काढण्यात आली आहे. प्रथमच युगल मुनीश्री हे णमोकार तीर्थ येथे होणाऱ्या जैन कुंभमेळा म्हणजेच प्राणपतिष्ठा समारोहाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. ते १२ वर्षांनंतर प्रथमच येथे येणार आहेत. त्यांच्या आगमनाने येथील सर्व भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ स्वागत यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष संतोष पेंढारी आणि संयोजक नीलम अजमेरा यांनी दिली. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून गुरुदेवांचे स्वागत करावे, असे आवाहन स्वागत समितीतर्फे प्रमोद लोहाडे, राहुल कासलीवाल, वैभव अजमेरा, भरत ठोळे, अतुल लोहाडे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मुनीश्री अमरकीर्ती

मुनीश्री अमोघकीर्ती या स्वागत यात्रेत पेठ येथील आदिवासी नृत्य, नाशिक ढोल, सायकलिस्ट पथक, लेडीज बॅण्ड, पोलिस बॅण्ड, चांदवड येथील बाल वारकरी पथक आपापल्या कला सादर करणार आहेत. याचबरोबर क्रेनद्वारे पुष्पवृष्टी, घोटी येथील महिलांचे लेझीम नृत्य, मालेगाव येथील महिलांद्वारे तीन पावली, लासलगांव येथील महिलांद्वारे विशेष प्रस्तुती करण्यात येणार आहे. वडाळीभोई येथील महिलांद्वारे वारीयात्रा आदी विविध आयोजन केले जाणार आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!