Homeमहाराष्ट्रMaharashtra Local body election 2025 pimpri chinchwad Ajit Pawar Sharad Pawar Alliance...

Maharashtra Local body election 2025 pimpri chinchwad Ajit Pawar Sharad Pawar Alliance UBT Sanjay Raut React


दोन्ही राष्ट्रवादी आघाडी UBT प्रतिक्रिया: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मुद्द्यावरुन पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातील आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पवारांच्या संभ्रमावस्थेवरुन प्रश्न

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याची मूभा दिली असल्याचा उल्लेख आजच केला. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरुन गोंधळ दिसत असतानाच राऊतांनी काँग्रेस सध्या सोबत असल्याचं वाटत नाही असं मत नोंदवलं आहे. पत्रकारांशी बोलताना राऊतांनी काँग्रेसने वेगळी चूल मांडण्याची गरज नसल्याचं म्हणत एकत्र लढावं असं आवाहन केलं. त्याचवेळी पत्रकारांनी राऊतांना शरद पवारांची संभ्रमावस्था दिसत असल्याचा उल्लेख करत प्रश्न विचारला.

शरद पवारांच्या पक्षाची फार मोठी भूमिका मुंबईत नाही, पण…

“शरद पवारांची संभ्रमावस्था दिसतेय. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात,” असं म्हणत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. “मी स्वत: चर्चा करणार आहे त्यांच्याशी. सुरुवात झाली आहे काल. त्यांचा आग्रह आहे की मी बाहेर पडू नये,” असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना, “मी राज ठाकरेंना भेटणार आहे. निवडणुकीत चर्चा सुरु ठेवाव्या लागतात. त्या संवादाचा माध्यम असतात. मी त्यांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या संमतीने बोलेन. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची मुंबईत फार मोठी भूमिका नाही. मुंबईबाहेर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारसाहेबांचा आहे. आमची भूमिका अशी आहे की राज्यात एकत्र लढायला हवं,” असं राऊत म्हणाले.

अगदी शेवटच्या ओळीत अजित पवारांचा उल्लेख

तसेच या विषयावर बोलताना अगदी शेवटच्या वाक्यात राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख केला. “आता अजित पवारांबरोबर त्यांची (शरद पवारांची) काय भूमिका आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं राऊत म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं चाललंय काय?

भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याच्या हलचाली सुरु केल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले. भाजपच्या निर्णयानंतर अजित पवारांनी स्थानिक नेत्यांना शरद पवार गटाशी युतीची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले. भाजपाच्या निर्णयामुळे महायुतीतील युती तुटली आणि अजित पवार गटाला धक्का बसला आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये याबाबत बैठकाही सुरू झाल्या असून, नाना काटे आणि सुनील गव्हाणे यांसारख्या नेत्यांनी भाजपविरोधात एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!