Homeमनोरंजनटीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला

IND VS SA T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात सीरिजमधील तिसरा सामना हा धर्मशाला स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने  प्रथम गोलंदाजी निवडली. यावेळी भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना घाम फोडत भेदक गोलंदाजी केली आणि 117 धावांवर ऑल आउट केले. त्यानंतर विजयासाठी 118 धावांचे आव्हान टीम इंडियाने 25 बॉल आणि 7 विकेट्स शिल्लक ठेवून पूर्ण केले. त्यामुळे आता टीम इंडियाने 5 सामन्यांच्या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी मिळवली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

118 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. गिल आणि अभिषेकने 5 ओव्हरमध्ये एकूण 60 धावा केल्या. अभिषेक मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात कॅच आउट झाला. तोपर्यंत त्याने 18 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केली. ज्यातून त्याच्या बॅटने 3 षटकार आणि 3 चौकार निघाले.

अभिषेक शर्मा बाद झाला तेव्हा 5.2 ओव्हरमध्ये टीम इंडियाचा स्कोअर 60 धावा होता. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी धीम्या गतीने धावा केल्या आणि पुढील 40 धावा करण्यासाठी फलंदाजांनी 53 बॉल खेळले. टीम इंडियाकडून शुभमन गिलने 28 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव हा 28  धावा करून बाद झाला.

भारतीय गोलंदाजांनी केला कहर :

धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा संघ 117 धावांत गुंडाळून धुव्वा उडवला. अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात हार्दिक पंड्याने त्याच्या टी 20 कारकिर्दीत गोलंदाज म्हणून 100  विकेट गाठल्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला किती धावांत ऑलआउट केले?
उत्तर: भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ११७ धावांत ऑलआउट केले.

अभिषेक शर्माने किती चेंडूंमध्ये किती धावा केल्या?
उत्तर: अभिषेक शर्माने १८ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या (३ षटकार आणि ३ चौकारांसह).

भारतीय गोलंदाजांपैकी कोणी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या?
उत्तर: अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!