कौटुंबिक कलहातून दोन कुटूंबाचा दुभंगलेला संसार समुपदेशनाने पुन्हा जुळविण्यात आला. शनिवार (१३ डिसेंबर) रोजी पाटोदा न्यायालयात पार पडलेल्या लोकन्यायालयात पार पडलेल्या समुपदेशनानंतर पती-पत्नीने वाद संपवून एकत्रीतपणे राहण्याचा निर्णय घेतला.या लोकन्यायालय
.
पती-पत्नीत मतदभेद, वाद विवाद होतच असतात परंतु यातूनच होणारा कौटूंबिक कलह दोघांचेही जीवन उध्दवस्त करतो. अशा दांपत्यांच्या जीवनातील कलहाला दुर करुन त्यांची संसार पुन्हा जुळवण्यासाठी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. अशाच प्रकारे पाटोदा येथे पार पडलेल्या लोकन्यायालयात दोन कुटूंबाचा वाद मांडण्यात आला. पॅनल क्रमांक १ चे प्रमुख दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एम.ए. शिंदे, सदस्य बी.जी. थोरवे, पॅनल क्रमांक २ चे प्रमुख म्हणुनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. डी. गीते, विधीज्ञ बी.आर. लऊळ यांनी या प्रसंगी समुपदेशनाचे कर्तव्य पार पाडले. सदर लोकन्यायालयात चालू वर्षातील एकूण ८८५ दाखल प्रकरणांपैकी २३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये दोन कौटुंबिक वादांमध्ये समेट घडवून पती-पत्नींचे वैवाहिक जीवन पूर्ववत करण्यात आले. दाखल असलेल्या ८९८ प्रकरणांपैकी २११ प्रकरणे यशस्वीपणे निकाली निघाली .
लोकन्यायालय माणुसकीचे व्यासपीठ लोकन्यायालयाच्या माध्यमातून प्रकरणे समुपदेशन व समन्वयाने निकाली काढली जातात. आरोप-प्रत्यारोप आणि निर्णयाच्या प्रतिक्षेत न्यायालयाच्या चकरा मारण्याऐवजी पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समन्वयातून प्रकरणे निकाली काढल्यास वाद त्वरीत मिटत आहेत. यामुळे लोकन्यायालय हे केवळ प्रकरणे निकाली काढण्याचेच नव्हे तर समाजाता सलोखा, समेट आणि माणुसकी जपणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे अधोरेखीत झाले आहे. या लोकन्यायालयातून अनेकांना दिलासा मिळाला .






















