Homeमनोरंजनलिओनेल मेस्सी गोट इंडिया टूर 2025 च्या चाहत्याने मेस्सीला पाहण्यासाठी स्वतःचे लग्न...

लिओनेल मेस्सी गोट इंडिया टूर 2025 च्या चाहत्याने मेस्सीला पाहण्यासाठी स्वतःचे लग्न आणि हनिमून चुकवला


लिओनेल मेस्सी भारत दौरा: फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी (lionel Messi) हा तब्बल 14 वर्षांनी भारतात आलाय. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून तो कोलकाता, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्या फॅन्सना भेटणार आहे. मेस्सीचा हा भारत दौरा त्याच्या भारतीय फॅन्ससाठी खूपच खास आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या फुटबॉलरची एक झलक पाहायला मिळावी यासाठी फॅन्स भारतातील विविध शहरांमधून मेस्सी भेट देणाऱ्या शहरांमध्ये पोहोचत आहेत. काही फॅन्स तर स्वतः चं लग्न आणि हनीमून सोडून मेस्सीला पाहण्यासाठी पोहोचले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

लग्न सोडून मेस्सीला पाहण्यासाठी पोहोचला :

कोलकात्यात ‘गोट इंडिया टूर’ अंतर्गत लियोनेल मेस्सी 13 डिसेंबर रोजी भारतात दाखल झाला आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर मेस्सीच्या स्वागतासाठी हजारो फॅन्स एयरपोर्टवर जमले होते. 2022 च्या फिफा वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार मेस्सीचे भारतातील तीन दिवसीय दौरेची सुरुवात कोलकात्यात झाली आहे. १३ डिसेंबर रोजी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये देखील मेस्सीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  लाखो, हजारो रुपयांची तिकीट काढून त्याचे चाहते त्याला बघायला आले होते. मात्र मॅनेजमेंट गंडलं आणि मेस्सी फक्त १० मिनिटं मैदानावर राहिला आणि निघून गेला. हजारो रुपयांचे तिकिटं खरेदी करून एक झलक सुद्धा मेस्सीला पाहता न आल्याने चाहते नाराज झाले आणि त्यांनी स्टेडियममधील सामाग्रीची तोडफोड केली. यावेळी एक चाहता मेस्सीला पाहण्यासाठी त्याच लग्न सोडून तिथे आला होता. एनआयला दिलेल्या मुलाखतीत चाहत्याने सांगितले की, आज त्याचं लग्न आहे मात्र मेस्सीचा खूप मोठा चाहता असल्याने त्याला पाहण्यासाठी त्याने सॉल्ट लेक स्टेडियम गाठलं होतं.

मेस्सीसाठी हनिमून केला कॅन्सल :

मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी सॉल्ट लेक स्टेडियमच्या बाहेर चाहते पोस्टर पकडून उभे होते. यात एक नवविवाहित जोडा सुद्धा होता, ज्यांनी मेस्सीला पाहण्यासाठी त्यांचा हनिमूनचा प्लॅन कॅन्सल केला.  एनआयला दिलेल्या मुलाखतीत चाहत्याने सांगितले की, ‘आमचे नुकतेच लग्न झाले आहे, पण मेस्सीच्या भेटीमुळे आम्ही आमचा हनिमून प्लॅन रद्द केला. आम्हाला मेस्सीला आधी पहायचे आहे. आम्ही गेल्या १०-१२ वर्षांपासून त्याच्या मागे येत आहोत आणि त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहोत’.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

लिओनेल मेस्सी भारतात कधी आला?
उत्तर: लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर १३ डिसेंबर रोजी भारतात दाखल झाला. त्याचा दौरा ‘गोट इंडिया टूर’ अंतर्गत आहे आणि तो तीन दिवसांचा आहे.

मेस्सीच्या भारत दौऱ्यात कोणत्या शहरांना भेट देणार आहे?
उत्तर: मेस्सी कोलकाता, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन फॅन्सना भेटणार आहे. दौऱ्याची सुरुवात कोलकात्यात झाली.

मेस्सीच्या स्वागतासाठी कोलकात्यात काय घडलं?
उत्तर: कोलकात्यात एयरपोर्टवर हजारो फॅन्स मेस्सीच्या स्वागतासाठी जमले होते. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, पण मेस्सी फक्त १० मिनिटे मैदानावर राहिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!