Homeमहाराष्ट्रPimpri Chinchwad Shock: Woman Sweeper Falls Into Water Tank; CCTV Captures Asha...

Pimpri Chinchwad Shock: Woman Sweeper Falls Into Water Tank; CCTV Captures Asha Dhone’s Death | झाडलोट करणाऱ्या महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू: पिंपरी चिंचवड येथील उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार; घटना CCTV मध्ये कैद – Maharashtra News


सोसायटीच्या पार्किंगमध्ये झाडू मारणाऱ्या एका महिलेचा पाण्याच्या भूमिगत टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. तिचा व्हिडिओ आज समोर आला आहे.

.

यासंबंधीच्या माहितीनुसार, आशाबाई ढोणे (46) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पिंपरी चिंचवड शहरातील डुडूळगाव परिसरातील यशदा स्प्लेंडर पार्क सोयायटीत झाडू मारण्याचे काम करत होत्या. त्या गुरूवारी सायंकाळी आपले काम करत होत्या. त्यांचा सोसायटीतील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यात दिसून येत आहे की, आशाबाई गुरुवारी सायंकाळी सोसायटीत झाडलोट करत होत्या. त्या झाडत – झाडत पाण्याच्या टाकीजवळ गेल्या. त्यावेळी पाण्याच्या टाकीला झाकण लावलेले नव्हते.

टाकीत पाय गेला अन्…

आशाबाईंचे लक्ष त्याकडे गेले नाही. त्यांनी टाकीजवळ झाडू मारून पुढे जात होत्या, तेवढ्यात त्यांचा पाय टाकीत गेला आणि त्या थेट खाली कोसळल्या. यावेळी यांनी मदतीसाठी हाका मारल्या. पण त्यांची हाक कुणाच्याही कानावर गेली नाही. अखेर काही वेळाने सुरक्षा रक्षक परिसरात पाहणी करत त्या ठिकाणी आले. त्यांना आशाबाई पाण्याच्या टाकीत पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पिंपरी चिंचवड येथील अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पण तोपर्यंत आशाबाईंचा मृत्यू झाला होता. त्यांनी त्यांचा मृतदेह पुढील सोपस्कारासाठी शासकीय इस्पितळात पाठवला.

आशाबाई कोसळल्या तेव्हा पाण्याची टाकी तुडूंब भरलेली होती. त्यामुळे काही क्षणांतच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, असे या प्रकरणी सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे ढोणे कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याच्या भूमिगत टाक्या असतात. त्यावर झाकण असते. पण अनेकदा ते झाकण टाकीवर लावण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे अशा घटना घडतात.

हे ही वाचा…

साधू संत झाडावर राहतात काय?:अण्णा हजारेंचा संतप्त संवाल; आज लोक बोलत नसले तरी एक दिवस चले जाव म्हणतील, सरकारला इशारा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला. या प्रकरणी त्यांनी ‘साधू संत झाडावर राहतात काय?’ असा सवाल करत एक दिवस लोकच या सरकारला चले जाव म्हणतील असा इशारा दिला. आज लोक बोलत नसले तरी एक दिवस येईल आणि ते चीड व्यक्त करत या सरकारला चले जाव म्हणतील. तो दिवस दूर नाही, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!