Homeमहाराष्ट्रनागपूर हिवाळी अधिवेशनात अपात्र लाभार्थी लाडकी बहिनमुळे महाराष्ट्र सरकारचे तब्बल 32 कोटींचे...

नागपूर हिवाळी अधिवेशनात अपात्र लाभार्थी लाडकी बहिनमुळे महाराष्ट्र सरकारचे तब्बल 32 कोटींचे नुकसान


लाडकी बहिन योजना: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकीकडे महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, दुसरीकडे सरकराने तब्बल 32 कोटी रुपयांचं नुकसान दिल्याची कबुली दिली आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल 32 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

26 लाख अपात्र महिला आणि 14 हजार 297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची कबुली सरकारने दिली आहे. अपात्र लाभार्थ्यांमध्ये साडेनऊ हजार शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे उघड झालं आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून लाभाची रक्कम वसुल केली जाणार असल्याची माहिती सरकारने लेखी स्वरुपात दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी भाजपा आमदालाच झापलं

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीणचा उल्लेख केल्याने भाजपाच्याच आमदाराला झापलं आहे. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांना कडक शब्दांत समज दिली.

राज्यात लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या ही अवैध दारू विक्री असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सभागृहात सांगितलं. हे सांगताना त्यांनी ही लाडक्या बहिणींची समस्या असल्याचं म्हटलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका अशा शब्दांत समज दिली.

काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीशी जोडू नका, असं सांगितलं होते. तरीही स्वपक्षाचे आमदार यांनी लाडकी बहीणींचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री संतापल्याचं पाहायला मिळालं.

लाडकी बहीण योजनेमुळे खरंच मदत झाली का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी पहिले वर्ष पूर्ण होत असताना, झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. यावेळी लाडकी बहीण संदर्भातही प्रश्न विचारण्यात आला.

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना खरंच मदत झालीय का? असा प्रश्न विचारला असता तब्बल 64 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे 26 टक्के थोडीफार मदत झाली असं सांगितलं आहे. 8 टक्के लोकांनी हा फक्त देखावा असल्याचं म्हटलं आहे. 2 टक्के लोकांनी मात्र माहिती नाही असं सांगत उत्तर देणं टाळलं. म्हणजे थोडक्यात  फायदा झाला असं सांगणाऱ्यांचा आकडा मोठा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!