जायकवाडी धरणात १३५० मेगावॅट फ्लोटिंग सोलारचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एनटीपीसीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. आता जायकवाडीनंतर मराठवाड्यातील सर्व मोठे प्रकल्प तसेच नगर आणि नाशिकमधील मोठ्या प्रकल्पांवर सोलार फ्लोटिंग प्रकल्प उभा
.
जलसंपदा विभागाने गोदावरी पाटबंधारे महामंडळ आणि कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळही दोन्ही महामंडळे स्वायत्त करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी शासनाकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारले जातील.
हा होणार फायदा
धरणांच्या जलाशयावरील सौरऊर्जाप्रकल्पांमुळे जमीन अधिग्रहणाची समस्या लागणार नाही. तसेच यामुळे कुठलेही प्रदूषण होणार नाही. थर्मलपॉवर प्रोजेक्टमधून वीजनिर्मिती केल्यानंतर वायुप्रदूषण होते. मात्र, हे प्रकल्प पर्यावरणपूरक मानले जातात.या ‘फ्लोटिंग सोलर” तंत्रज्ञानाचासर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन कमीप्रमाणात होईल.
आर्थिक सल्लागाराची शासनाने केली नियुक्ती
शासनाने याबाबत आर्थिकसल्लागाराची नियुक्ती केली आहे. याआर्थिक सल्लागाराच्या माध्यमातूनमहामंडळाचे उत्पन्न कसे वाढवतायेईल यासाठी प्रयत्न करण्यात येणारआहेत. महामंडळाच्या वतीने आर्थिकउत्पन्न वाढवण्यासाठी आता मत्स्यपरवानेदेखील दिले जातील. तसेचजलपर्यटनासाठी काय करता येऊशकते याचेदेखील नियोजन करण्यातयेत आहे.
जायकवाडीत १३५० मेगावॅटचा प्रकल्प जायकवाडीमध्ये पक्षीअभयारण्य असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या.मात्र, या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. १३५० मेगावॅटचाहा प्रकल्प एनटीपीसीच्या (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन)माध्यमातून उभारला जाणार आहे. याबाबत शासनासोबतएमओयू करण्यात येणार आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग, ऊर्जाविभाग आणि एनटीपीसी यांच्या माध्यमातून उभारणी होईल.
मोठ्या धरणांवर सोलार बसवणार
याबाबत गोदावरी पाटबंधारेमहामंडळाचे कार्यकारी संचालकसंतोष तिरमनवार यांनी सांगितलेकी, आपल्या महामंडळातजायकवाडीमध्ये सध्या फ्लोटिंगसोलार प्रकल्प बसवले जातआहेत. त्यानंतर माजलगाव,दुधना, ऊर्ध्व पैनगंगा, मांजरा,येलदरी, नगर जिल्ह्यातील मुळा,नाशिकमधील गंगापूर यासहअनेक प्रकल्पांमध्ये हे प्रकल्पहोणार आहेत. मराठवाड्यातअकरा मोठे प्रकल्प आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणातवीजनिर्मिती यामधून होईल.
प्रकल्पामुळे वाढणार महामंडळाचे उत्पन्न
महामंडळांना स्वायत्तता देण्याचा निर्णय जलसंपदाने घेतला आहे. यामुळे महामंडळाकडून आर्थिक पर्याय शोधलेजात आहेत. यात मोठ्या प्रकल्पांवर फ्लोटिंग सोलार उभारले जातील. एका महिन्यात स्वारस्य पत्र मागवले जातील.त्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात केली जाईल. - संतोष तिरमनवार, कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ.






















