Homeसांस्कृतिकDatta Jayanti 2025 : दत्त जयंती 4 की 5 डिसेंबर नक्की कधी?...

Datta Jayanti 2025 : दत्त जयंती 4 की 5 डिसेंबर नक्की कधी? जयंती संध्याकाळी 6 वाजता का साजरी केली जाते?


दत्त जयंती 2025 : महाराष्ट्रात दत्त जयंतीला विशेष महत्त्व असून यंदा यादिवशी ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ योग जुळून आला आहे. दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाल्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचं एकत्रित अवतार मानला गेला आहे. त्यामुळे दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा केल्याचं पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. दत्त जयंतीच्या तारखे विषयी भक्तांमध्ये संभ्रम आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कधी आहे दत्त जयंती 2025?

पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 सकाळी 8:38 वाजेपासून 5 डिसेंबर 2025 सकाळी 4:44 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार गुरुवारी 4 डिसेंबर 2025 ला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे.

दत्त जयंती पूजेसाठी मुहूर्त

दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5:14 ते 6:06 वाजेपर्यंत आहे. यावेळी अभिजित मुहूर्त असणार नाही. तर संधिप्रकाश मुहूर्त संध्याकाळी 5.58 ते 6.24 वाजेपर्यंत असेल. अमृत काळ दुपारी 12.20 ते 1.58 वाजेपर्यंत असेल. संध्याकाळी 6 नंतर दत्त जयंती साजरी केली जाणार आहे.

दत्तजयंती सायंकाळी सहा वाजता का साजरी केली जाते?

मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त गुरुंचा जन्म झाला होता. त्यामुळे दत्तजयंती सायंकाळी 6 वाजता साजरी केली जाते. कारण पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेय यांचा जन्म याच ‘गोरज मुहूर्ता’वर झाला होता. काही ठिकाणी हा जन्मोत्सव ‘प्रदोषकाली’ साजरा करण्याची परंपरा आहे.

दत्तजयंती पूजाविधी

दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर संध्याकाळी दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करा. पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करा. त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना हार फुले अर्पण करा. धूप,अगरबत्ती आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नामजप करा. दत्त बावनी,गुरुचरित्र अध्याय 16 व 18 वाचा. गुरुलीलामृत, स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदयातील ग्रंथ वाचा. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा. दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा कोणतीही पिवळी मिठाई, फळे देखील तुम्ही नैवेद्यात दाखवू शकतात.

या मंत्रांचा करा जप

ओम द्रम दत्तात्रेय नम:

ओम श्री गुरुदेव दत्त

याशिवाय दत्तात्रेय स्तोत्र, अवधूत गीतेचे श्लोक, गुरु स्तुती, श्री दत्त चालीसा यांचे पठणही या दिवशी शुभ मानले जाते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!