Homeमहाराष्ट्रPune has morning problems, evening flights, passengers stranded as several IndiGo flights...

Pune has morning problems, evening flights, passengers stranded as several IndiGo flights have been cancelled in the last 2 days | पुण्यामध्ये सकाळी अडचण, सायंकाळी उड्डाण: गेल्या 2 दिवसांत इंडिगो विमानांच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा ठिय्या – Pune News

पुण्यातील प्रचंड वाहतूक कोंडी मधून वाट काढत पुणे विमानतळावर पोहोचल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून जे दृश्य पुणे विमानतळावर दिसले ते इतर दिवसांपेक्षा वेगळे होते. मागील २ दिवसांत इंडिगो विमानांच्या तब्बल ३८ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा ठिय्या होता. शुक्

.

दिल्लीला वकिलांसोबत महत्त्वपूर्ण बैठकीला जात असलेल्या डॉ.फरहा अन्वर हुसेन शेख म्हणाल्या, मला दिल्लीत आज जाणे अतिशय आवश्यक होते. परंतु अचानक इंडिगो विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने मी प्रवास करू शकत नाही. त्यामुळे विनाकारण मला माझे कायदेशीर काम पुढे ढकलावे लागले आहे. माझ्यासारखा अनेक प्रवाशांना हा अनुभव आला असून विमान कंपनीच्या अशा प्रकारे नियोजनशून्य कारभाराचा आम्हाला फटका बसला.

अतिमहत्त्वाच्या बैठका अन् कौटुंबिक कार्यक्रम चुकल्याने प्रवाशांचा संताप

देशातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या टर्मिनस-२ वर गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विमान कंपन्यांच्या, विशेषतः “इंडिगो’च्या अचानक विमाने रद्द करण्याच्या निर्णयामुळे आणि प्रवाशांना पर्यायी व्यवस्था न पुरवल्यामुळे अनेक महत्त्वाच्या बैठका व कौटुंबिक कार्यक्रम चुकल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला. ​इंडिगोच्या या अनागोंदीमुळे विमानतळावरील इतर कंपन्यांच्या प्रवाशांनाही गर्दी आणि लांबच लांब रांगांमुळे त्रास सहन करावा लागला.

माझी आजी अनेक तास व्हीलचेअरवर, नातीची खंत

८९ वर्षांच्या आजीसोबत बसलेली नात शेफाली चिटणीस म्हणाली, मध्यरात्री तीन वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही विमानाची वाट पाहत बसलो. माझी आजी अनेक तास व्हीलचेअरवर बसून असून तिला आता विमानतळावर बसणेही अशक्य झाले आहे. प्रवाशांना विमानतळावर कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नसून गोंधळाची परिस्थिती सर्वत्र आहे. इतर विमान कंपन्यांनी अचानक भाडेवाढ केल्याने दुसऱ्या विमानांनी जाणे शक्य नाही. विमानतळावर विमाने पार्किंग जागा दहा असून त्यापैकी नऊ जागांवर इंडिगो विमाने उभी राहिल्याने इतर विमान कंपन्यांना दोन दिवस अडचण झाल्याची माहिती आम्हाला समजली.

दु:खद प्रसंगी उपस्थित राहू न शकल्याने तीव्र वेदना

महत्त्वाच्या कौटुंबिक अडचणींसाठी प्रवास करणाऱ्यांनाही इंडिगोच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. व्यावसायिक संदीप सोनवलकर हे याचे एक उदाहरण आहेत. त्यांना पत्नीसह भिलाई येथील अंत्यसंस्कारासाठी तत्काळ जायचे होते. परंतु, त्यांची रायपूरची इंडिगो फ्लाइट रद्द झाली. सोनवलकर यांनी आपली व्यथा अत्यंत भावुक शब्दांत कथन केली. ते म्हणाले, “एकाएकी फ्लाइट रद्द झाल्यामुळे इतर विमानांचे तिकीट दर गगनाला भिडले होते.’

चार तास धावपळ करून बँकॉकचे विमान पकडले

​मुंबई विमानतळावर इंडिगोच्या विमानाने जाण्यासाठी आलेल्या बहुतांश प्रवाशांनी कंपनीकडून योग्य माहिती मिळत नसल्याची तक्रार केली. अनेक प्रवाशांनी सांगितले की, त्यांना विमानाची स्थिती आणि पर्यायी व्यवस्था याबद्दल साधी माहिती देण्यासाठीही कुणी उपलब्ध नव्हते. या गोंधळामुळे अनेक प्रवाशांना फटका बसला. राजेश नायर हे चार तास मुंबई विमानतळावर अडकून पडले होते, पण अखेर धावपळ करून त्यांनी बँकॉकचे विमान कसबसे पकडले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!