Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने कशी कामगिरी केली, याचा महाराष्ट्र सरकारचा...

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने कशी कामगिरी केली, याचा महाराष्ट्र सरकारचा सर्व्हे


देवेंद्र फडणवीस सरकारची कामगिरी राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महायुतीचं सरकार स्थापन होऊन आज वर्ष होत आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याची धुरा आपल्या हाती घेतली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमन झाले. वर्षभरात तिन्ही पक्षांनी सरकार चालवताना नेमकी कशी कामगिरी केली याचा आढावा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी पहिले वर्ष पूर्ण होत असताना, झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली? कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या? सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे? याचा कानोसा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं एका महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? असा प्रश्न विचारला असता सर्वाधिक म्हणजेच 40 लोकांनी सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. तर तब्बल 31 टक्के लोकांनी अतीउत्कृष्ट असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. 23 टक्के लोकांनी साधारण कामगिरी केल्याचं मत नोंदवलं आहे. तर 6 टक्के लोकांनी निराशाजनक म्हटलं आहे. म्हणजेच सरकारच्या कामगिरीवर समाधानी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

झी 24 तास आणि JDS चा महासर्व्हे

14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांना समाविष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन व डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.

पहिल्या पद्धतीत प्रत्यक्ष भेटी व घरघर फिरून सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके समाविष्ट होते. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.

तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे आहे.  मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना समाविष्ट करण्यात आलं.

AI टेलिफोनिक व्हॉइस सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादामुळे महाराष्ट्रातील जनमताचा कानोसा घेणारे हे सर्वेक्षण आगळे वेगळे ठरले आहे.

महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!