Homeमहाराष्ट्रMumbai Ajit Pawar Ajitparv Claims; Mitkari Predicts Ajit Rise Targets Shinde |...

Mumbai Ajit Pawar Ajitparv Claims; Mitkari Predicts Ajit Rise Targets Shinde | महाराष्ट्रात लवकरच अजितपर्व येणार?: राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा दावा; अजित पवार कधी रुसत नाहीत म्हणत एकनाथ शिंदे यांना टोला – Maharashtra News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महिन्याभरात देशाच्या पंतप्रधानपदी एखादा मराठी माणूस बसू शकतो असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू असताना आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी

.

अमोल मिटकरी यासंबंधी बोलताना म्हणाले की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसू शकतो हे विधान सहजपणे केले नव्हते. त्याचे हे विधान गांभिर्याने घेण्याची गरज आहे. महायुती सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीपर्यंत महाराष्ट्रात काहीतरी वेगळे होऊ शकते का? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हा यांना विचारले पाहिजे. त्याच अनुषंगाने मला महाराष्ट्रात लवकरच अजितपर्व येईल असे वाटते.

लाडकी बहीण योजना अजित पवारांचेच अपत्य

अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार ऊर्जावान पद्धतीने काम करत आहेत. लाडकी बहीण योजना ही संकल्पनाही दादांचीच होती. त्यांनीच त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींचा भक्कम आधार मिळाला. अजित पवार हे काम करणारे नेतृत्व आहे. त्यांचे केव्हाच रुसवेफुगवे नसतात ते कधीही सरकारवर नाराज होत नाही. विरोधात त्यांच्यावर खूप मोठी टीका करतात. तरीही ते अजिबात विचलीत होत नाहीत. ते आपले काम नेटाने करतात. जनतेची सेवा करतात. महायुती घट्ट करतात.

एकनाथ शिंदेंनाही मारला टोला

अमोल मिटकरी यांनी यावेळी अजित पवारांची स्तुती करताना अप्रत्यक्षपणे महायुतीत वारंवार नाराज होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, तुम्ही अजित पवारांकडे बारकाईने पाहा. त्यांनी कधीच उद्वेग केला नाही. ते कधी रुसून बारामतीला गेले नाही. ते कुठेही आक्रमक झाले नाहीत. अजित पवार शांततेने आपले काम करत राहतात. दादांचे काम जनतेलाही खूप आवडत आहे.

अजित पवारांनी आतापर्यंत केव्हाच कोणता अट्टहास केला नाही. आमच्या पक्षातून काही लोक तिकडे गेले. त्यावरही ते काही बोलले नाही. ते म्हणतात की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. दादांनी महायुतीत रुसण्या फुगण्याचा कार्यक्रम केला नाही. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारले. आ्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहोत हे देखील मान्य करतो. पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे कार्तिकी एकादशीला आम्ही त्यांनाच विठ्ठलाच्या पूजेचा मान दिला. पार्थ पवार प्रकरणातही दादांचा फोन कधी नॉट रिचेबल झाला नाही. त्यांनी संयम ठेवला. मागील वर्षभरात आम्ही महायुतीत अतिशय घट्टपणे काम केले, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

आत्ता पाहू पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, एपस्टाईन फाईल्सवरुन अमेरिकेत मागील 6 महिन्यांपासून मोठा गदारोळ उडाला आहे. ती फाईल उघडल्यानंतर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम पडू शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. जेफ्री अ‍ॅमस्टिन हा अमेरिकेतील मोठा उद्योगपती आहे. त्याने कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुंतवायचे आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची नावे अमेरिकेत आली आहेत. त्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल.

अमेरिकेत निवडणूक आयोगाचे फार कडक निकष आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणे हा त्यांचा विषय आहे. अमेरिकेची संसद त्यांच्या मागे लागली आहे. ते ट्रम्प यांच्या मागे नावे उघड करण्याची मागणी करत आहेत. पण ट्रम्प तयार नाहीत. संसद मागच्या 6 महिन्यांपासून ट्रम्प यांच्या मागे लागली असून, तिने 10 हजार दस्तऐवज ताब्यात घेतली आहेत. संसद ही कागदपत्रे उघड करू शकते, असे चव्हाण म्हणाले होते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!