Homeमनोरंजनभारत विरुद्ध सा 2रा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये भारत विरुद्ध 4...

भारत विरुद्ध सा 2रा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये भारत विरुद्ध 4 गडी राखून जिंकला


IND VS SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात बुधवार 3 डिसेंबर रोजी वनडे सीरिजमधला दुसरा सामना खेळवला गेला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं होतं आणि हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट राखून पूर्ण केलं. हा दक्षिण आफ्रिकेने परदेशात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. सीरिजमधील दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवून सीरिज 1-1 अशा बरोबरीत आणली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या सीरिजमधला दुसरा सामना आयोजित करण्यात आला. या सामन्याचा टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला भारताला फलंदाजीचं आव्हान दिलं. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हे सलामी फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकले नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडने दमदार फलंदाजी केली. यात आधी ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. त्यानंतर विराट कोहलीने शतक पूर्ण केलं. विराटने 93 बॉलमध्ये 102 धावा केल्या. दरम्यान त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. टीम इंडियाने 5 विकेट्स गमावून 358 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं.

दक्षिण आफ्रिकेकडून विजयाचं आव्हान पूर्ण करताना एडन मार्करमने 110, टेम्बा बाऊमाने 46, मॅथ्यू ब्रीट्झकेने 68, डेवॉल्ड ब्रेव्हिसने 54 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून सातव्या विकेटसाठी ४० धावांची पार्टनरशिप कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज यांनी केली. त्यांनी शेवटपर्यंत संघासाठी झुंज दिली आणि ४ विकेट राखून विजयाचं आव्हान पूर्ण केलं.

भारताची प्लेईंग 11:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्ण

दक्षिण आफ्रिका 11 :
क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, टेंबा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, देवाल्ड ब्रेव्हिस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी न्गिडी





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!