Homeदेश-विदेशMH370 फ्लाइट मिस्ट्री विमानातील 239 प्रवासी 20,000 फूट खोल समुद्रातून अचानक बेपत्ता...

MH370 फ्लाइट मिस्ट्री विमानातील 239 प्रवासी 20,000 फूट खोल समुद्रातून अचानक बेपत्ता झाले.

मिशन फ्लाइट MH370: मलेशिया एअरलाइन्सच्या फ्लाइट MH370 चा शोध पुन्हा सुरू होणार आहे. हे विमान 2014 मध्ये 239 लोकांसह बेपत्ता झाले होते. मलेशिया सरकारने टेक्सासस्थित मरीन रोबोटिक्स कंपनी ओशन इन्फिनिटीला या मोहिमेसाठी अंतिम मान्यता दिली आहे.  मलेशियाने जाहीर केले आहे की बेपत्ता मलेशिया एअरलाइन्सच्या विमान MH370 च्या अवशेषांचा शोध 30 डिसेंबर रोजी पुन्हा सुरू होईल.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

वाहतूक मंत्रालयाने बुधवारी स्थानिक माध्यमांना सांगितले की, या नवीन अपडेटचा उद्देश या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि सांत्वन देण्यासाठी आहे. बोईंग 777 विमान 2014 मध्ये क्वालालंपूरहून बीजिंगला जात असताना बेपत्ता झाले होते, ज्यामुळे विमान वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा शोध सुरू झाला. ही नवी शोध मोहीम 55 दिवस असणार आहे. यापूर्वी, या वर्षी मार्चमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली होती, परंतु खराब हवामानामुळे ती काही काळासाठी थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या शोध मोहिमेत सागरी शोध फर्म ओशन इन्फिनिटीचा समावेश असेल, जी विमान सापडण्याची शक्यता असलेल्या लक्ष्यित क्षेत्राचा शोध घेईल.

विमान वाहतूक इतिहासातील सर्वात मोठे रहस्य

सन 2014 मध्ये  हे विमान 239 प्रवाशांसह बेपत्ता झाले होते. मलेशिया सरकारने या मोहिमेसाठी टेक्सासस्थित मरीन रोबोटिक्स कंपनी ओशन इन्फिनिटीला अंतिम मान्यता दिली आहे.  हे शोध अभियानात विमानाचे अवशेष सापडले नाहीत तर कंपनीला पैसे दिले जाणार नाहीत. जर अवशेष सापडला तर कंपनीला 70 दशलक्ष डॉलर दिले जातील.
ओशन इन्फिनिटीने यापूर्वी 2018 मध्ये एक अयशस्वी शोध मोहीम राबवली होती. यावेळी, कंपनी दक्षिण हिंद महासागरातील 15,000 चौरस किलोमीटरच्या नवीन भागात शोध घेईल. मलेशिया सरकार या प्रयत्नातून बेपत्ता प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत करू इच्छिते.

सन 2014 मध्ये  मलेशिया एअरलाइन्सचे MH370 हे विमान  क्वालालंपूरहून बीजिंगला निघाले होते. या विमानात एकूण 239 प्रवासी होते. उड्डाणादरम्यान ते व्हिएतनामच्या हवाई हद्दीतून जात असताना अचानक विमानाचा संपर्क तुटला. उपग्रह डेटा विश्लेषणाच्या आधारे, असे मानले जाते की हे विमान पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील दक्षिण हिंद महासागरात कोसळले. तथापि, यासंदर्भात केलेल्या दोन मोठ्या शोधांमध्ये कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. विमानाचे काहीच अवशेष येथे सापडले नाहीत.

विमानाने उड्डाणानंतर 40 मिनिटांनी शेवटचा सिग्नल पाठवला. जेव्हा ते व्हिएतनामी हवाई हद्दीत पोहोचले तेव्हा कॅप्टन जहारी अहमद शाह यांचा शेवटचा संदेश होता, “शुभ रात्री, मलेशियन तीन सात शून्य.” यानंतर लगेचच, विमानाच्या ट्रान्सपॉन्डरने काम करणे थांबवले, ज्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण झाले. लष्करी रडारनुसार, विमानाने अचानक उड्डाणाची दिशा बदलली आणि उत्तर मलेशिया आणि पेनांग बेटावरून अंदमान समुद्राकडे वळले. नंतर ते इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या टोकावर पोहोचले आणि तिथून दक्षिणेकडे वळताच, सर्व संपर्क पूर्णपणे तुटला. अशा प्रकारचा अपघात यापूर्वीही घडला आहे.   एअर फ्रान्सचे विमान AF447 देखील अपघाताचे बळी ठरले. 1 जून 2009  रोजी हे विमान  रिओ दि जानेरो (ब्राझील) येथून पॅरिस (फ्रान्स) ला जात होते. या विमानात एकूण 12 क्रू मेंमबरसह  २२८ लोक होते. उड्डाणादरम्यान, विमान अटलांटिक महासागरावरून अचानक रडारवरून गायब झाले. चार वर्षांच्या सखोल शोध आणि तपासानंतर, या अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड तसेच  वैमानिकाच्या चुकीच्या प्रतिक्रिया असल्याचे निष्पन्न झाले.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!