Homeमहाराष्ट्रBeed Gevrai Poll Violence: Ex-MLA Amar Singh Pandit's PA Attacked, Alleges 'Conspiracy...

Beed Gevrai Poll Violence: Ex-MLA Amar Singh Pandit’s PA Attacked, Alleges ‘Conspiracy to Kill’ Him; 55 Booked | माजी आमदारांना संपवण्याचा कट होता: बीडमध्ये मतदानादिवशी गोंधळ; खूनाचा आरोप असलेल्या व्यक्तींचाही हल्ल्यात सहभाग – Beed News

बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेला गोंधळ आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा स्थानिक राजकारणातील तणाव चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले असले, तरी गेवराईमध्ये मात्र पंडित आणि पवार समर्थकांम

.

घटनेच्या दिवशी गेवराईमधील मतदान केंद्रांवर पंडित आणि पवार समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक प्रचारापासूनच दोन्ही गटांमध्ये तणाव वाढत होता. मतदान सुरू असताना काही ठिकाणी बाचाबाची झाली आणि तीच पुढे राड्यात बदलल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच दरम्यान अमृत डावखर यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले. डावखर सांगतात की, ते त्या वेळी पंडित यांच्या कार्यालयात होते. त्यावेळी काही संशयित व्यक्तींनी कार्यालयावर अचानक गाडी घालत प्रवेश केला आणि त्यांच्यासह इतरांवर हल्ला केल्याचा त्यांचा दावा आहे. हा हल्ला अचानक झाल्याने त्यांना स्वतःचे रक्षण करता आले नाही, असेही ते म्हणाले.

डावखर यांनी माध्यमांशी बोलताना सर्वात गंभीर असा दावा केला की, हा हल्ला फक्त वादातून झाला नसून, माजी आमदार अमरसिंह पंडित यांना लक्ष्य करूनच हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी पंडित घटनास्थळी नसल्याचे पाहताच त्यांना नाही तर त्यांचे माणूस संपवा, असे म्हणत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी काठी, बेल्ट, लाथा-बुके वापरून मारहाण केल्याचा आरोप डावखर यांनी केला. त्यांच्या मते, जर ड्रायव्हर मध्ये आला नसता, तर मला जिवंत सोडलं नसतं. या प्रकरणाला आणखी मोठं वळण देत त्यांनी आरोप केला की, हल्लेखोरांचा संबंध पवार कुटुंबाशी असल्याचे त्यांना स्पष्ट दिसले. मात्र, हे आरोप आहेत, त्याबाबत पोलिस तपासानंतरच सत्यता उजेडात येणार आहे.

खूनाचा आरोप असलेल्या व्यक्तींचाही हल्ल्यात सहभाग

हे प्रकरण इतक्यावर थांबले नाही. डावखर यांनी काही हल्लेखोरांच्या भूतकाळाचा उल्लेखही केला. त्यांच्या मते, पूर्वीच्या एका प्रकरणात खून झाल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींचाही या हल्ल्यात सहभाग होता. आधी शिक्षा भोगून बाहेर आल्यावरही त्यांचे वर्तन बदलले नसल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व आरोपांमुळे राजकीय तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सध्या सर्व बाजूंनी कसून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखी आरोपींची ओळख पटवली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला

दरम्यान, या प्रकरणात गेवराई पोलिसांनी पाचपेक्षा अधिक कलमांखाली 55 जणांवर गुन्हे नोंदवले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील शांततेचा भंग, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणे, तसेच हाणामारीचे गुन्हे यांचा समावेश आहे. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला असून पंडित आणि पवार गटातील व्यक्ती या दोन्ही बाजूंतील लोकांचा यात समावेश आहे. यामुळे हे प्रकरण आता कायद्याच्या कचाट्यात गेलं असून, राजकारणात या मुद्द्याचा वापर अधिक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या अराजकतेनंतर पोलिस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला आहे आणि भविष्यात शांतता राखण्यासाठी अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!