राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जा
.
ईव्हीएम सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्ताचे निर्देश
मतदान यंत्रांची हातळणी काळजीपूर्वक करण्यात यावी. मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांसाठी 24 तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. सुरक्षा उपकरणे (उदा. गोदामाच्या प्रवेद्वाराबाहेरील सीसीटीव्ही, सुरक्षा आलार्म सिस्टीम, अग्निशमन यंत्रणा इ.) व्यवस्थित कार्यांन्वित असल्याची खात्री करून घ्यावी. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोदामांबाबत आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अवगत करावे. त्याचबरोबर निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना गोदामाचे प्रवेशद्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी, असेही निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार
राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले; तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य भरात उत्साहात मतदान
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आज सायंकाळी संपुष्टात आली. राज्यातील 262 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज (मंगळवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 वाजता सुरू झालेली ही मतदान प्रक्रिया सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चालली. राज्यभरात मतदारांनी उत्साहान मतदान केले.
आज पार पडलेल्या मतदानानंतर हजारो उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. आता उमेदवारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे आणि निकालाकडे लागले आहे. स्थानिक पातळीवर कोणाची सत्ता येणार आणि कोण बाजी मारणार? हे आता निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.






















