Homeमहाराष्ट्रSangli Jat Municipal Election Violence; NCP Candidate’s House Attacked, BJP Workers Accused...

Sangli Jat Municipal Election Violence; NCP Candidate’s House Attacked, BJP Workers Accused | जत नगरपरिषदेच्या निवडणुकीला हिंसक वळण: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला; मित्रपक्ष भाजपवर आरोप – Maharashtra News

सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेत मतदानाच्या एक दिवस अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. राष्ट्रवादीने या प्रकरणी थेट आपला मित्रपक्ष

.

राष्ट्रवादी काँग्रेसने जत नगरपरिषदेच्या निडवणुकीत सुरेश शिंदे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. ते मतदारांच्या भेटीगाठी घेऊन जोमाने आपला प्रचार करत आहेत. इथे उद्या मतदान होणार आहे. पण तत्पूर्वी, आज पहाटे काही अज्ञात हल्लेखोरांनी सुरेश शिंदे यांच्या घरावर व गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यात सुदैवाने कुणीही जखमी जाले नाही. पण शिंदे यांच्या गाडीचे व घराचे मोठे नुकसान झाले. नगरपरिषदेसाठी उद्या मतदान होणार असताना आपल्या उमेदवाराच्या घरावर हा हल्ला झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची भीती असल्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकही नियुक्त केले आहे. याकामी सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राष्ट्रवादीने हल्ल्यासाठी धरले भाजपला जबाबदार

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास जगताप यांनी या घटनेसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. हा हल्ला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला. निवडणुकीतील पराभवाड्या भीतीने त्यांनी असा भ्याड हल्ला केला, असे ते म्हणाले. नागरिकांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच या घटनेमुळे उद्याची निवडणूक शांततेत पार पडले का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. काही नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांना गस्त वाढवण्याचे आवाहन केले आहे.

रात्री 10 वा. होणार प्रचार बंद

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या प्रचाराचा धुरळा आज रात्री 10 वा. खाली बसेल. त्यानंतर उमेदवारांना प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतही जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, उद्याचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी निवडूक निकाल जाहीर होणार आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!