Homeमहाराष्ट्र'We will break through the maze of opponents, we are modern Abhimanyu'...

‘We will break through the maze of opponents, we are modern Abhimanyu’ | ‘विरोधकांचा चक्रव्यूह भेदणार, आम्ही आधुनिक अभिमन्यू’: देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांना थेट इशारा – Kolhapur News

कराड पालिका निवडणुकीत आपलेही आणि विरोधकही एक झाले आहेत. त्यांनी भाजपाला चारही बाजूने घेरलंय. महाभारतातल्या अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरणं माहीत होतं. बाहेर पडणं माहीत नव्हतं. परंतु, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला ते माहि

.

कराड नगरपालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती भाषण केले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र येत भाजपासमोर आव्हान उभे केले आहे. त्यांचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांना विरोधकांनी घेरलंय. त्यात आमचेही आहेत. आम्ही विरोधकांचा चक्रव्यूह भेदून दाखवू.

निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मी प्रत्येक शहरात जातोय. रोज पाच-सहा सभा घेतो. परंतु, कुठल्याही सभेत मी कुणावर टीका करत नाही. कुठल्या पक्षाला उणंदुणं बोलत नाही. कारण, आपल्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. आम्ही काय केलंय आणि काय करणार आहोत, याच्या आधारावर मी मत मांडण्यासाठी आलोय, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मतदारांसमोर मांडली.

स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. देशाच्या संविधानाने लोकशाहीत आपल्याला काही अधिकार दिले असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांना आणि तुम्हाला, मला सुद्धा एकच मत देता येतं. ते एक मत देताना योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपण देशाचा पंतप्रधान ठरवतो, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ठरवतो आणि शहरात मतदान करून आपल्या शहराचं प्रशासन पाच वर्ष कोण चांगलं चालवेल, याचा निर्णय आपण करत असतो. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवात आपण विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कमळाची चिंता करा, पुढची पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ, असं भावनिक आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कराडकरांना केलं.

प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाच्या पुनर्विकासाचा विचार आमदार अतुल भोसले यांनी मांडला आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्या यशवंतरावांच्या समाधीचा विचार इतक्या वर्षात पुन्हा कुणी केला नाही. एकदा जे काम झालं, त्यानंतर परत त्याच्याकडे कुणी पाहिलं नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला लगावला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!