Homeमनोरंजनभारत विरुद्ध भारत कसोटी मालिका गमावल्यानंतर रांची स्टेडियममध्ये गौतम गंभीरला चाहत्यांनी ट्रोल...

भारत विरुद्ध भारत कसोटी मालिका गमावल्यानंतर रांची स्टेडियममध्ये गौतम गंभीरला चाहत्यांनी ट्रोल केले


IND VS SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा (Team India) दारुण पराभव झाला. गुवाहाटी टेस्टमध्ये तर टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव झाला आणि हा पराभव टीम इंडियाच्या आतापर्यंतच्या टेस्ट इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव होता. यानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यावर सर्वस्थरातून टीका होत आहे. गुवाहाटी टेस्टमध्ये टीम इंडियाचा (Team India) पराभव झाल्यावर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी ‘गौतम गंभीर हाय हाय’ च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर आता प्रेक्षकांचा हाच राग गंभीरला रांची स्टेडियमवर सुद्धा सहन करावा लागतोय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून टीम इंडियाचं घरच्या मैदानावरील टेस्ट क्रिकेटमधील प्रदर्शन ढासळलं आहे. यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला 3-0 ने पराभूत व्हावं लागलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुद्धा टीम इंडियाला 2-0 ने क्लीन स्वीप मिळाला. त्यामुळे घरच्या मैदानावरील टीम इंडियाच्या खराब टेस्ट परफॉर्मन्समुळे चाहते हेड कोच गौतम गंभीरवर नाराजी व्यक्त करतायत. गंभीर आल्यानंतर भारतीय टेस्ट संघात अनेक बदल करण्यात आले.

रांची स्टेडियमवर घोषणा :

27 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया रांचीमध्ये पोहोचली. 30 नोव्हेंबर रोजी रांची येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडिया रांची स्टेडियमवर सराव करत होती, यावेळी हेड कोच गौतम गंभीर सुद्धा याठिकाणी उपस्थित होता. टीम इंडियाचा सराव पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियममध्ये गर्दी केली. यात काही चाहत्यांचा रोष हेड कोच गौतम गंभीरला स्वीकारावा लागला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये फॅन्स गंभीरला पाहून बोलतायत की, ‘आपण घरच्या मैदानावर 3-0 असा पराभव पत्करला आणि नंतर दक्षिण आफ्रिकेकडूनही पराभव पत्करला. कोचिंग सोडा. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपण जिंकू शकत नाही. 2027 चा वर्ल्ड कप विसरून जा’.

गंभीर विरोधात दिलेल्या घोषणा :

22 नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या गुवाहाटी टेस्टचा बुधवारी शेवटचा दिवस होता. दुसऱ्या टेस्ट सामन्यात सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिका टीम इंडियावर वरचढ ठरताना पाहायला मिळाली. टीम इंडिया फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा प्रभाव दाखवू शकली नाही. टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही भारतीय फॅन्सनी ‘गौतम गंभीर हाय हाय’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. काही मिनिटं या घोषणा सुरु होत्या, त्यानंतर लगोलग स्टेडियममधील सुरक्षा रक्षकांनी येऊन या फॅन्सना हटकलं. सध्या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

हेही वाचा : IND VS SA पहिल्या वनडे मॅचमध्ये पाऊस अडथळा ठरणार? पाहा Weather Reports

भारताची संभाव्य खेळणे 11:

केएल राहुल (कीपर), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, रुतुराज गायकवाड, प्रसिध्द कृष्णा, अर्शरुदीप सिंग, ध्रुवदीप सिंग.

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य खेळणे 11:

टेम्बा बावुमा (टेनिस), एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, मार्को जॅन्सन, टोनी डी जोर्झी, रुबिन हरमन, ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रिट्झके, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रायन रिकेल्टन, प्रेनलन सब्रालिन.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच कधी झाला?
गौतम गंभीर राहुल द्रविड याच्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

गौतम गंभीरच्या कोचिंगवर का प्रश्न उपस्थित होतायत?
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधील पराभवानंतर गौतम गंभीरच्या प्रशिक्षणावर प्रश्न उपस्थित होतायत.

गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी आहे?
गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाची कामगिरी मध्यम राहिली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!