HomeमनोरंजनTruth Behind Sunscreen Causes Vitamin D deficiency | उन्हापासून त्वचेला वाचवणारी 'सनस्क्रीन'च...

Truth Behind Sunscreen Causes Vitamin D deficiency | उन्हापासून त्वचेला वाचवणारी ‘सनस्क्रीन’च ” ठरतेय व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे कारण? जाणून घ्या यामगचे सत्य


सनस्क्रीनमागील सत्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता होते: त्वचेची काळजी घेणे हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनले आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा कोणीही सनस्क्रीन  लावल्याशिवाय बाहेर जात नाही. उन्हाच्या प्रखर किरणांमुळे त्वचेला इजा पोहोचेल, त्वचा काळी पडेल, त्वचेवर डाग येतील ही भीती असते. विशेषतः स्त्रिया अधिक प्रमाणात सनस्क्रीनचा वापर करतात. पण  त्वचेचे उन्हाच्या किरणांपासून रक्षण करण्यासाठी वापरली जाणारी सनस्क्रीनच तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे मोठे कारण आहे का? असा प्रश्न तुम्हालाही कधी न कधी पडला असेल. चला तर मग यामागचे सत्य जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सूर्याच्या किरणांमध्ये त्वचेला पोषण देणारे आणि व्हिटॅमिन डी पुरवणारे यूवी-बी किरणे असतात. तज्ज्ञांच्या मते सनस्क्रीन  वापरल्याने सूर्यप्रकाशामुळे त्वचेला मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊ शकते, पण पूर्णपणे नाही. सन्सस्क्रीन मधील घटक यूवी-बी किरणांना फिल्टर  करण्याचे काम करतात. पण त्यांना पूर्णपणे रोखत नाहीत. त्यामुळे सन्सस्क्रीन वापरल्याने त्वचेला व्हिटॅमिन डी मिळतच नाही हे खोटे आहे. पण हे देखील तुम्ही किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारची सन्सस्क्रीन वापरत आहात यावर अवलंबून आहे.

उच्च एसपीएफ (SPF) असलेली सन्सस्क्रीन वापरल्यास ती यूवी-बी किरणांना प्रभावीपणे रोखते. व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी त्वचेला यूवी-बी किरणांची आवश्यकता असते. उच्च एसपीएफ (SPF) असलेली सनस्क्रीन व्हिटॅमिन डीच्या निर्मितीमध्ये अडथळा आणू शकते. म्हणूनच कमी एसपीएफ (SPF) असलेली सन्सस्क्रीन वापरणे अधिक फायदेशीर ठरते. काही सन्सस्क्रीन असे असतात जे सूर्यप्रकाश पूर्णपणे रोखत नाहीत. यामुळे त्वचेला व्हिटॅमिन डीच्या निर्मितीमध्ये कोणताही अडथळा येत नाही.

काही व्यक्ती दररोज सन्सस्क्रीनचा वापर करतात तरीही त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी किंवा जास्त नसून योग्य प्रमाणात असते. याचे कारण असे की ते, जास्त प्रमाणाच सन्सस्क्रिनचा वापर करत नाहीत. तुम्हीही हा उपाय करू शकता. शिवाय दिवसातून 15 ते 20 मिनिटे सन्सस्क्रीनचा वापर न करता उन्हात थांबा. यामुळे त्वचेला थेट सूर्यप्रकाश मिळेल आणि व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होईल.

याशिवाय आहारात बदल करूनही तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सॅल्मन, मॅकरेल, हेरिंग आणि ट्यूना हे चरबीयुक्त मासे समाविष्ट करू शकता. तसेच दूध, अंडी, मशरूम, तृणधान्ये, संत्र्याचा रस, दही या सर्व पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!