Homeमहाराष्ट्रJalgaon Missing Couple Mystery; Telangana Family Vanishes Near Khamgaon–Malkapur Highway | लग्नाला...

Jalgaon Missing Couple Mystery; Telangana Family Vanishes Near Khamgaon–Malkapur Highway | लग्नाला निघालेले दाम्पत्य गूढपणे बेपत्ता: तेलंगणातून जळगावच्या दिशेने निघाले, पण रस्त्यात खामगाव – मलकापूर दरम्यान झाले बेपत्ता – Maharashtra News

तेलंगणातून जळगावच्या दिशेने निघालेले एक दाम्पत्य अर्ध्या रस्त्यातून गूढपणे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर गावालगत आढळले. त्यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस सध्य

.

या प्रकरणी रमेश पाटील यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलतबंधू पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणात त्यांची पत्नी नम्रता व मुलीसह राहतात. ते तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत नोकरीस आहेत. 27 नोव्हेंबर रोजीस काळी 6 च्या सुमारास पद्मसिंह आपली पत्नी व मुलीसह घरच्या लग्नासाठी जळगावला येण्यासाठी निघाले. ते त्यांच्या कारने गावी येत होते. सकाळी घरून निघाल्यानंतर त्यांचे त्यांच्या भावाशी बोलणे झाले. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत ते घरी पोहोचणे अपेक्षित होते.

वडनेर भोलजी गावालगत तुटला संपर्क

पण रात्रीचे 10 वाजले तरी ते घरी पोहोचले नाही. आणखी काही वेळ वाट पाहून रमेश यांनी पद्मसिंह यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यानंतर त्यांनी त्यांची वहिणी तथा पद्मसिंह यांची पत्नी नम्रता यांना फोन केला. त्यांचाही फोन बंद येत होता. त्यानंतर कालपर्यंत म्हणजे 28 नोव्हेंबरपर्यंत नातेवाईकांनी त्यांचा फोन ट्राय केला. त्यांचा शोध घेतला. पण ते सापडले नाही. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यात बेपत्ता दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असणाऱ्या वडनेर गावालगत आढळले.

वडनेर भोलजी येथूनच त्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे आता पोलिस वडनेर परिसरात या दाम्पत्याचा शोध घेत आहेत. त्यांनी या दाम्पत्याचा घातपात झाल्याचाही संशय व्यक्त केला आहे. या घटनाक्रामुळे पद्मसिंह यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांत भीतीचे सावट पसरले आहे.

जळगाव शहरात चादर गँगचा धुमाकूळ

दुसरीकडे, जळगाव शहरात चादर गँगने धुमाकूळ घातला आहे. या गँगमध्ये काही मुलींचाही समावेश आहे. या गँगने शहरातील सावखेडा भागातीलवर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल, जी एच रायसोनी पब्लिक स्कूल, गुरुकुल किड्स व शानबाग विद्यालय या 4 शाळांना लक्ष करून 2 लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही रोकड विद्यार्थ्यांची फी व शिष्यवृत्तीची असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!