Homeमहाराष्ट्रPune Alcohol Theft: Two Tankers Seized, 1 Crore Goods Confiscated; Excise Action...

Pune Alcohol Theft: Two Tankers Seized, 1 Crore Goods Confiscated; Excise Action | पुण्यात मद्यार्क चोरी: दोन टँकरसह १ कोटीचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पण आरोपी फरार – Pune News

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने टँकरमधून मद्यार्क चोरी आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन टँकरसह एकूण १ कोटी १९ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना भोर तालुक्यातील निगडे गाव हद

.

आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी सापळा रचला. यावेळी अशोक लेलॅण्ड कंपनीचे दोन १६ चाकी टँकर (एमएच-१२ वायबी-९८८६ आणि एमएच-१२ युएम-९८८७) संशयास्पदरीत्या थांबले होते. चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे टँकरमधून मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तात्काळ छापा टाकला असता, आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

छाप्यादरम्यान, टँकर क्र. एमएच-१२ वायबी-९८८६ मधून ३९,८०० लिटर मद्यार्क आणि टँकर क्र. एमएच-१२ युएम-९८८७ मधून ३९,८०० लिटर मद्यार्क जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, २०० लिटर क्षमतेचे दोन ड्रम (प्रत्येकी १८० लिटर मद्यार्क), ३५ लिटर क्षमतेचा एक कॅन (३५ लिटर मद्यार्क), २० लिटर क्षमतेची एक प्लास्टिक बादली (२० लिटर मद्यार्क), रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे आणि पक्कड यांसारखे साहित्यही जप्त करण्यात आले. एकूण ७९ हजार ६०० लिटर मद्यार्क आणि इतर साहित्यासह १ कोटी १९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक आणि अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(अ)(ई), ६७, ८१, ८३, ९० आणि १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.

या कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक बिराज माने, धीरज सस्ते, एन.जी. निकम, जवान सतीश पांधे, रुतिक कोळपे, शशिकांत भाट, रणजित चव्हाण, संदीप सुर्वे, माधव माडे, राहुल तारळकर तसेच वाहनचालक शशिकांत झिंगळे आणि अमोल दळवी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात करत आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!