Homeसांस्कृतिकMargashirsh Guruvar 2025 : मार्गशीर्षमधील पहिला गुरुवार! महालक्ष्मी पूजा विधी, मुहूर्त आणि...

Margashirsh Guruvar 2025 : मार्गशीर्षमधील पहिला गुरुवार! महालक्ष्मी पूजा विधी, मुहूर्त आणि साहित्य जाणून घ्या


मार्गशीर्ष गुरुवर 2025 : श्रावणानुसार मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात पवित्र महिनासह अतिशय महत्त्व आहे. श्रावणात सोमवारी महादेवाचं व्रत करण्यात येतं. तर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारला महत्त्व असतो. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. महाराष्ट्रात मार्गशीर्ष गुरुवारला अतिशय महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळं भक्तांना वैभव, यश, समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. मार्गशीर्ष पहिला गुरुवारीला पूजा विधीसाठी संपूर्ण दिवस शुभ असणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मार्गशीर्ष गुरुवार २०२५ (मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधि २०२५)

पहिला गुरुवार    मार्गशीर्ष शुक्ल पक्ष    27 नोव्हेंबर 2025
दुसरा गुरुवार    मार्गशीर्ष शुक्ल पक्ष    04 डिसेंबर 2025
तिसरा गुरुवार    मार्गशीर्ष शुक्ल पक्ष    11 डिसेंबर 2025
चौथा गुरुवार    मार्गशीर्ष शुक्ल पक्ष    18 डिसेंबर 2025

मार्गशीर्ष गुरुवारी अशी करा घटस्थापना! (Detailed Puja Ritual)

पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रे परिधान करा. घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजागृहात चौरंग किंवा पाट मांडा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. त्यानंतर एका कलशात पाणी घेऊन त्यात नाणे, सुपारी आणि हळद-कुंकू घाला. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवा आणि त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवा.चौरंगावर कलशाखाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर कलश स्थापित करा. कलशाच्या पुढे किंवा बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. चौरंगाभोवती आणि समोर रांगोळी काढा. कलशावर हळद-कुंकू आणि अक्षता वाहा. कलशाची वस्त्रमाळ (कापसाची) घाला आणि फुलांनी सजावट करा. देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुले, अत्तर, वस्त्रासाठी कापूस अर्पण करा. विड्याच्या पानांवर सुपारी आणि दक्षिणा ठेवून अर्पण करा. तुपाचे किंवा तेलाचे निरांजन/दीप प्रज्वलित करा. त्यानंतर ‘मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा’ वाचा किंवा श्रवण करा. कथेचे वाचन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. पुरणपोळी, शिरा, फळे आणि लाह्या-फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा. नंतर माता लक्ष्मीची आरती करून कुटुंबासह प्रसाद ग्रहण करा.

Poojche Sahitya (पूजेसाठी लागणारे साहित्य)

पूजा साहित्य: कलश, ताम्हण, पळी-पंचपात्र, तांदूळ(अक्षता), हळद-कुंकू, गुलाल, रांगोळी, कापूस, कापसाचे वस्त्र (वस्त्रमाळ), नवीन वस्त्र (साडी/ओटीचे), अत्तर.
नैवेद्य: पुरणपोळी (किंवा घरात तयार केलेला गोड पदार्थ), शिरा, लाडू, फळे (केळी, सफरचंद इ.), प्रसाद म्हणून लाह्या व फुटाणे.
फुलं:    लाल किंवा गुलाबी रंगाची फुले (गुलाब, कमळ विशेष), हार, तुळस (वस्त्रमाळ झाल्यावर अर्पण करावी).
कलश आणि सजावट: कलशासाठी पाणी, तांदूळ किंवा गहू (कलशाखाली ठेवण्यासाठी), आंब्याची पाने, श्रीफळ (नारळ), आरसा, फणी.
इतर गोष्टी:    देवीची मूर्ती किंवा प्रतिमा, चौरंग/पाट, आसन, सुपारी, विड्याची पाने, दीप (तेल किंवा तूप).
कथा: मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा ग्रंथ.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!