Homeमहाराष्ट्रभोकरदन नगरपरिषद निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांची जोरदार तयारी

भोकरदन नगरपरिषद निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांची जोरदार तयारी


रावसाहेब दानवे : जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी होमग्राऊंड असलेल्या भोकरदन नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एका वेळेचा अपवाद वगळता कधीही हाती न आलेल्या नगरपरिषदेसाठी दानवे यांनी जोरदार तयारी केली आहे. तर काँग्रेसकडून आपला गड कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. नेमकं काय सुरू आहे भोकरदनमध्ये पाहूयात सविस्तर

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

जालना जिल्ह्यात 3 नगरपरिषदांच्या निवडणूक होत आहेत. यामध्ये सर्वात लक्षवेधी लढत ठरत आहे ती भोकरदनची. कारण भोकरदन हा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं होमग्राऊंड आहे.  लोकसभेतील पराभवामुळे पक्षात काहीसे साईडलाईन झालेल्या दानवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ‘अभी तो मै जिंदा हूँ’ हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.

भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला

इथे भाजपने शिवसेना-रिपाइंसोबत युती करत प्रचारात जोरदार आघाडी घेतलीय. भाजपने ज्येष्ठ कार्यकर्त्या आशा माळी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत मैदानात उतरवलंय. तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे.

भोकरदन नगरपरिषद ही 2001 ते 2005 अपवाद वळगता कधीही भाजपच्या ताब्यात नव्हती. त्यामुळे 20 वर्षानंतर पुन्हा दानवे यांनी ही नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांनी आपण केलेल्या विकासकामांचा दाखला देत मतदारांना साद घातली आहे.

‘मी अजूनही जिवंत आहे’ चा संदेश देण्याचा प्रयत्न

भाजपने इथं कितीही जोर लावला असला तरी काँग्रेसचं पारडं जड मानलं जातं आहे. काँग्रेसने यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या सूनबाईलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत रिंगणात उतरवलं आहे. जनता कायम आपल्या पाठीशी असल्याचं सांगत काँग्रेसने पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी भोकरदनची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तसेच राजकारणात ”अभी तो मै जिंदा हूँ”चा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे. नगरपरिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम दानवे यांच्याकडून होतं आहे. असं असले तरी दानवे यांच्या प्रयत्नाला किती यश मिळत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!