Homeमहाराष्ट्रशिवतीर्ह महानगरपालिका निवडणुकीतील राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सभेची आतली कहाणी

शिवतीर्ह महानगरपालिका निवडणुकीतील राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सभेची आतली कहाणी


राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीची आतली गोष्ट: उद्धव ठाकरेंनी आज राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतली. यावेळी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची चर्चा झाली. जवळपास दीड तास ठाकरे बंधूंची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना UBT आणि मनसेचे नेते उपस्थित होते. शिवसेना UBTकडून वरुण सरदेसाई, अनिल परब, सूरज चव्हाण तर मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, राजू पाटील बैठकीवेळी उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे मुंबई मनपासह ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील जागावाटपावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाची प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. मनसे 80 ते 100 जागांसाठी आग्रही असल्याचं कळत आहे. त्यामुळे काही जागांबाबत ठाकरे बंधूंमध्ये पेच असण्याची शक्यता आहे. यावरच आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची इनसाईड स्टोरी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीतील इनसाईट स्टोरी समोर आली आहे.  मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवलीतील जागावाटपावर चर्चा करण्यात आल्याचं समजत आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर मोठी खलबतं सुरु आहे. केवळ दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये युतीच्या फॉर्म्युलावर चर्चा झाली. मुंबईत कॉग्रेसबाबत दोन्ही ठाकरेंचे धोरण काय? यावर उद्धव- राज ठाकरेंची शिवतीर्थवर खलबतं. दोन्ही पक्षांच्या इतर नेत्यांना सोबत न घेता केवळ ठाकरे बंधूंमध्येच चर्चा झाल्याचंही समजत आहे.

एकीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतरही ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सोबत घेण्याकरता प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस स्वबळाचा नारा देऊनही मुंबईत शरद पवारांसोबत चूल मांडण्यासाठी उत्सुक आहे. या सगळ्यात मनसे सध्यातरी मविआपासून वेगळी असली तरी ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेला मविआत सामावून घेता येइल का? काँग्रेस वेगळी लढल्यास त्याचा ठाकरेंच्या युतीला फटका बसेल का? तसे झाल्यास काँग्रेसचे नेमके करायचे काय? या प्रश्नांवर दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये आज चर्चा झाल्याची माहिती आहे.

तसंच, मुंबईत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या समान प्राबल्यांच्या जागांवर काय करायचं याचीही प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!