हिंगोली पालिका निवडणुकीत उमेदवार व समर्थक बाजूलाच राहिले असून नेतेच एकमेकांवर तोंडसुख घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर हिस्ट्रीशीटर असल्याचा आरोप भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला तर दुसरीकडे आमदार मुटकुळे या
.
हिंगोली पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी 127 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. मतदानाची तारीख जवळ येत असतांना प्रचारालाही वेग आला आहे. पालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे हिंगोलीत शिंदे सेना, भाजपा, ठाकरे गट नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहे. प्रत्येक सभांमधून नेते मंडळी एकमेकांवर तोंडसुख घेऊ लागले आहे. नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपात उमेदवार व समर्थकांची चांगलीच गोची झाली आहे.
आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपये घेऊन शिंदे सेनेत प्रवेश केल्याचा आरोप केला. प्रवेशापूर्वी उद्धव ठाकरे देव माणूस आहे त्यांच्या पाठीमागे रहा, पळून जाणाऱ्यांची मुले मुंजे राहतील असे म्हणाले अन पैसे मिळाल्यानंतर शिंदे सेनेत गेल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार बांगर मित्र पक्षाचे असले तरी त्यांचे अन माझे विचार कधीच जुळाले नाही ते हिस्ट्रीशीटर असल्याचा आरोपही आमदार मुटकुळे यांनी केला.
दरम्यान, त्यांच्या आरोपाला उत्तरदेतांना आमदार बांगर यांनीही आमदार मुटकुळे यांच्यावर कडाडून टीका केली. हिंगोली शहरातील एक क्लिप बाहेर काढली तर आमदार मुटकुळे यांना तोंड काढायला जागा राहणार नाही ते फाशी घेतील. एक महिन्यापूर्वी त्यांच्या मुलालाही एका घरात पकडल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार मुटकुळे यांची नजर वाईट असून त्यांना कोणी घरातही येऊ देत नाही. मतमोजणी नंतरच दुध का दुध अन पाणी का पाणी होईल असे आमदार बांगर यांनी स्पष्ट केले.






















