Homeदेश-विदेशचीन युनान प्रांत एचआयव्ही गोळी 10 वर्ष लग्न आरोग्य गुन्हे मराठी बातम्या

चीन युनान प्रांत एचआयव्ही गोळी 10 वर्ष लग्न आरोग्य गुन्हे मराठी बातम्या


चीन युनान: चीनच्या युनान प्रांतातील एका जोडप्याच्या आयुष्यात 10 वर्षांच्या विवाहानंतर धक्कादायक सत्य उघडकीस आले. आपल्याला लिव्हरची समस्या असल्याचे सांगून विवाहितेचा पती रोज रात्री झोपण्यापुर्वी लाल गोळी घ्यायचा. दहा वर्षे त्याचं हे गोळी घेणं सुरुच होतं. यानंतर पत्नीला जे कळालं, त्यानंतर तिच्या पायाखालची जमिनच सरकली. काय घडलं नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

विवाहाच्या सुरुवातीच्या दिवसांत हे जोडपे असुरक्षित शारीरिक संबंध ठेवत असे. मात्र पतीला 2011 मध्ये एचआयव्हीचा निदान झाले. त्याने हे गुप्त ठेवण्यासाठी पत्नीला फसवले आणि दररोज रात्री एक लाल गोळी घेत असल्याचे सांगितले.
पत्नीला मात्र ही गोळी यकृताच्या (लिव्हर) आजारासाठी असल्याचे वाटत होते. हा भ्रम पतीने वर्षानुवर्षे कायम ठेवला, ज्यामुळे पत्नीला एचआयव्हीचा धोका निर्माण झाला. पतीने नंतर माफी मागितली. मी औषधांमुळे आजार नियंत्रणात ठेवला होता, पण सत्य लपवण्यामागे भीती आणि वैवाहिक जीवन वाचवण्याचा हेतू असल्याचे त्याने सांगितले.

जुगार प्रकरणात अटक आणि…

पतीला बेकायदेशीर जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक झाली. यानंतर तुरुंग प्रशासनाने पत्नीकडे पतीच्या वैद्यकीय माहिती आणि औषधांची मागणी केली. यावेळी पत्नीला धक्का बसला. कारण पती घेत असलेली लाल गोळी लिव्हरची नव्हे, तर एचआयव्हीविरुद्धची औषधे आहेत, याचा खुलासा तिला झाला होता. 2011 पासून पती एचआयव्हीचा रुग्ण असल्याचे समोर आले. तुरुंग अधिकाऱ्यांनी औषधे मागितल्यावर पत्नीने पतीच्या मेडिकल हिस्ट्रीची तपासणी केली. ज्यात एचआयव्हीचे निदान स्पष्टपणे नोंदवलेले होते.

यानंतर पत्नी घाबरली आणि तिने ताबडतोब स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेतली.  जी निगेटीव्ह आली. असे असले तरी विवाहाच्या सुरुवातीला असुरक्षित संबंधांमुळे तिला आरोग्य धोका जाणवला आणि तिच्या मनात भीती निर्माण झाली. 10 वर्षे पतीने सत्य लपवून माझे जीवन धोक्यात घातल्याचे तिने सांगितले. भावनिकदृष्ट्या मी खचली आणि विश्वासघाताची भावना माझ्या मनात तीव्र झाल्याचे ती म्हणाली.

स्थानिक न्यायालयाने पत्नीच्या तक्रारीची दखल घेतली आणि फसवणुकीच्या आधारावर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली. पतीला तुरुंगात ठेवण्यात आले असून, जुगार प्रकरणाबरोबरच एचआयव्ही लपवण्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. या घटनेने चीनमध्ये एचआयव्ही रुग्णांच्या वैवाहिक जबाबदाऱ्यांबाबत चर्चा तापली आहे.

न्यायालयाचा निकाल

युनान न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल दिला आणि घटस्फोट मंजूर केला. पत्नीला न्याय मिळाला असला तरी, तिच्या जीवनात कायमची जखम उमटली. या घटनेमुळे एचआयव्ही रुग्णांना सत्य सांगण्याची गरज अधोरेखित होते. चीन सरकारने अशा प्रकरणांसाठी जागरूकता अभियान सुरू करण्याची शिफारस केलीय.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: चीनमधील त्या पतीला एचआयव्ही कधी कळला आणि त्याने पत्नीला किती वर्षे लपवले?

उत्तर: पतीला २०११ मध्येच एचआयव्ही झाल्याचे निदान झाले होते. त्याने हे सत्य पूर्ण १३-१४ वर्षे (विवाहानंतर १०+ वर्षे) पत्नीपासून लपवून ठेवले आणि दररोज घेत असलेली एचआयव्हीची लाल गोळी ही यकृताच्या (लिव्हर) आजाराची औषधे असल्याचे सांगितले.

प्रश्न: पत्नीला पतीच्या एचआयव्हीचे सत्य कसे आणि कधी कळले?

उत्तर: पतीला बेकायदेशीर जुगार खेळल्याबद्दल अटक झाली. तुरुंग प्रशासनाने पतीच्या नियमित औषधांची मागणी केली तेव्हा पत्नीला प्रथम संशय आला. वैद्यकीय कागदपत्रे तपासल्यावर तिला कळले की ती लाल गोळी एचआयव्हीची औषधे आहे. त्यानंतर पतीनेही तुरुंगात कबूल केले की त्याने १०+ वर्षे सत्य लपवले होते.

प्रश्न: पत्नीला एचआयव्ही झाला का? आणि या प्रकरणात न्यायालयाचा निकाल काय आला?

उत्तर: सुदैवाने पत्नीची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक) आली, म्हणजे तिला संसर्ग झाला नाही. मात्र विश्वासघात आणि जीविताचा धोका निर्माण केल्याबद्दल पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आणि युनान प्रांतातील न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!