Homeदेश-विदेशग्रीनलँड आणि आइसलँड कथा आइसलँड हिरवे का आहे आणि ग्रीनलँड बर्फाच्छादित नावांचे...

ग्रीनलँड आणि आइसलँड कथा आइसलँड हिरवे का आहे आणि ग्रीनलँड बर्फाच्छादित नावांचे खरे हेतू मनोरंजक तथ्ये जे तुम्हाला धक्का देतील


आइसलँड हिरवे आणि ग्रीनलँड बर्फाळ का आहे: ग्रीनलँडमध्ये बर्फ पडतो आणि आइसलँड हिरवागार आहे असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. मुळात या दोन्ही देशांची नावं ज्यावेळेस ठेवण्यात आली त्यावेळेस त्यामागे काही विशेष हेतू होता. या हेतूने जागांना नावं ठेवली खरी पण मग पुढे हीच नावं कायम राहिली आणि त्यामुळेच आज ग्रीनलँडमध्ये बर्फ म्हणजेच बर्फाची पांढरी चादर दिसून येते. तर आइसलँडमध्ये नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ दिसते. या दोन्ही देशांची नावं अशी का ठेवण्यात आली आणि आता असं विरोधाभास असलेलं चित्र का दिसतं हे जाणून घेऊयात…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ग्रीनलँडमध्ये सगळीकडे बर्फच बर्फ

तुम्हाला ठाऊक नसेल तर सांगू इच्छितो की, ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँडचे एकूण क्षेत्रफळ 21.6 लाख चौरस किलोमीटर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ग्रीनलँडचा 80% भाग बर्फाने व्यापलेला आहे. ग्रीनलँडचा बहुतेक भाग बर्फ आणि हिमनद्यांनी वेढलेला आहे. या नावामागे एक इतिहास आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की सुमारे 25 लाख वर्षांपूर्वी हे ठिकाण हिरवेगार होते.

…म्हणून मुद्दाम ग्रीनलँड नाव ठेवलं!

काही दाव्यांनुसार सुमारे 982 साली भटकंती करणाऱ्या ‘एरिक द रेड’ला नॉर्वे आणि आइसलँडमधून हाकलून लावण्यात आले. त्याने एक नवीन भूमी शोधली. हीच भूमी आज ग्रीनलँड नावाने ओळखळी जाते. खरं तर त्याला माहित होते की हा परिसर पूर्णपणे बर्फाने व्यापलेला आहे, परंतु तिथे लोकांनी येऊन वसाहत करावी अशी त्याची इच्छा होती. म्हणून, त्याने त्याला ‘ग्रीनलँड’ असे आकर्षक नाव दिले. या नावाच्या माध्यमातून लोकांना हा एक हिरवा, सुपीक आणि राहण्यास योग्य क्षेत्र आहे असं वाटून येथे वसाहत वाढेल या हेतूनेच हे नाव देण्यात आलं.

नक्की वाचा >> भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? 28 पैकी 9 राज्यं आकाराने या जिल्हापेक्षाही छोटी

अगदी उलट चित्र आइसलँडमध्ये

या उलट परिस्थिती आइसलँडची आहे. आता आइसलँड नाव ऐकून असे वाटेल की येथे सर्वत्र फक्त बर्फ आणि बर्फच असेल. परंतु प्रत्यक्षात असं नाहीये. इथे म्हणजेच आइसलँडवर जिथेही पहाल तिथे तुम्हाला फक्त हिरवळ दिसते. आइसलँडमध्ये गरम पाण्याचे झरे आणि ज्वालामुखी असलेले प्रांतदेखील आहेत.

…अन् आइसलँड नाव पडलं!

एका दाव्यानुसार, नवव्या शतकात संशोधक ‘ह्राफना-फ्लोकी विल्गेरडार्सन’ आइसलँड शोधण्यासाठी आला होता. प्रवासादरम्यान त्याला काही अडचणी आणि थंड हवामानाचा सामना करावा लागला. तो भटकंतीदरम्यान उंच पर्वतावर चढताच त्याला दिसले की सर्वत्र बर्फ आहे, म्हणूनच त्याने या भूमीचे नाव आइसलँड ठेवले.

नक्की वाचा >> मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला कोणता? पुण्यापासून हाकेच्या अंतरावर पण 99% लोकांना नावही माहित नाही

…म्हणून मुद्दाम आइसलँड नाव ठेवलं

काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की आइसलँड नाव देण्यामागील उद्देश असा होता की इतर लोकांना येथे स्थायिक होण्यास रस नसावा. कमीत कमी लोक या ठिकाणी यावेत आणि त्यामाध्यमातून हे सुंदर ठिकाण लोकांपासून दूर राहावे आणि बाह्य आक्रमणकर्त्यांपासून देखील सुरक्षित राहावे, असा अगदी उलट विचार हे नाव ठेवण्यामागे होता असं सांगितलं जातं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!