Homeमहाराष्ट्रDatta Jayanti celebrations begin; Mass chanting of hymns amidst great suffering |...

Datta Jayanti celebrations begin; Mass chanting of hymns amidst great suffering | दत्त जयंती उत्सव सुरू; घोरात्कष्टात स्तोत्राचे सामूहिक पठण: पुणे आणि जगभरात शेकडो भक्तांचा सहभाग, जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमूला – Pune News

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार यांच्या वतीने १२८ व्या दत्तजयंती उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने बुधवार पेठेतील दत्तमंदिराजवळील उत्सव मंडपात प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित ‘घो

.

या कार्यक्रमाचे आयोजन दत्तजयंती उत्सवाच्या प्रारंभी करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख चिदानंद अवधूत प. पू. बाबा महाराज तराणेकर (इंदूर), जया तराणेकर, वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. नारायणरत्न शरदशास्त्री जोशी महाराज, देविदास जोशी, हरी मुस्तीकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, शिरीष पाटुकले, शिरीष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. प. पू. बाबा महाराज तराणेकर यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी आणि राजेंद्र बलकवडे यांनी या उत्सवाचे नियोजन केले आहे. शरदशास्त्री जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणजे मानवतेची गाथा आहेत आणि त्यांच्या स्तोत्राच्या सामूहिक पाठाने त्यांचे स्मरण झाले.

प. पू. बाबा महाराज तराणेकर यांनी नमूद केले की, देशभरात अनेक दत्त मंदिरे असली तरी, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे दत्त जयंतीची सुरुवात लोकमंगलवर्धक ‘घोरात्कष्टात’ च्या सहस्त्र आवर्तनाने होते. ही परंपरा अन्यत्र कुठेही नाही. ‘घोरात्कष्टात’ स्तोत्रपठण हे केवळ आपल्यासाठी नसून, आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या शुद्धीकरणासाठीची एक दैवी चिकित्सा आहे.

अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की, ट्रस्टचा १२८ वा दत्त जयंती उत्सव या कार्यक्रमाद्वारे सुरू झाला आहे. तब्बल १५ वर्षांपूर्वी केवळ २० ते २५ साधकांसह सुरू झालेला हा स्तोत्र पठणाचा उपक्रम आज महाराष्ट्रासह भारतातील विविध शहरांतील शाखांमध्ये आणि ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, ब्रिटन यांसह विविध देशांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेही झाला. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासकांनी एकत्र येऊन सामूहिक उपासना करावी, या उद्देशाने हे स्तोत्र पठण आयोजित करण्यात आले होते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!