HomeमनोरंजनIND vs SA टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी नवा कर्णधार मिळाला,...

IND vs SA टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी नवा कर्णधार मिळाला, संघ जाहीर झाला


IND vs SA टीम इंडिया: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेत केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. शुभमन गिल या सिरिजसाठी उपलब्ध नसेल. दरम्यान उपकर्णधार श्रेयस अय्यर बऱ्याच काळापासून दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे टीम सिलेक्टर्सनी केएल राहुल टीमचा कर्णधार असेल असा निर्णय घेतलाय. टीममध्ये काही नवीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

केएल राहुलला सूत्र

दक्षिण आफ्रिका विरुद्ध 3 सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी टीम इंडियाचा नवा कर्णधार केएल राहुलची निवड झालीय. शुभमन गिल दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याने आणि श्रेयस अय्यर अद्याप बरा न झाल्याने निवड समितीने राहुलवर विश्वास टाकलाय. राहुलने याआधीही तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केलंय, त्यामुळे त्याला हा अनुभव फायदेशीर ठरेल.

मालिकेचे वेळापत्रक

पहिली वन-डे 30 नोव्हेंबर रोजी रांचीत खेळवली जाणार आहे.  दुसरी वन-डे 3 डिसेंबर रोजी रायपूर येथे तर तिसरी वन-डे 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. सध्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे वन-डे मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

दिग्गज खेळाडू खेळणार

रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळणार आहेत, ही चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. पण जसप्रीत बुमराहला कामाच्या ताणामुळे विश्रांती देण्यात आलीय. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनाही आराम दिलाय. श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेली दुखापत अद्याप बरी झाली नसल्याने तो 2-3 महिने मैदानाबाहेर राहणार आहे.

नवे चेहरे आणि परतलेले खेळाडू

ऋषभ पंत तब्बल 15 महिन्यांनंतर वन-डे टीम पुनरागमन करतोय. तो दुसरा विकेटकीपर असेल. तिलक वर्माला मधल्या फळीत मोठी संधी मिळालीय. नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा हे दोन नवे अष्टपैलू वेगवान गोलंदाज टीममध्ये दाखल झालेयत. रुतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल यांनाही संधी मिळालीय.

वन डे साठी टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, रुतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग.कसोटीनंतर आता वन-डेत भारताला दक्षिण आफ्रिकेला हरवून मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात नवा जोश आणि नव्या चेहऱ्यांसह टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वन-डे मालिकेचा कर्णधार कोण आहे?

उत्तर: केएल राहुल हा मालिकेचा कर्णधार आहे. शुभमन गिल दुखापतीमुळे आणि श्रेयस अय्यर बरा न झाल्याने राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रश्न: वन-डे मालिकेचे सामने कधी आणि कुठे होणार आहेत?

उत्तर:  पहिला वन-डे: ३० नोव्हेंबर – रांची
दुसरा वन-डे: ३ डिसेंबर – रायपूर
तिसरा वन-डे: ६ डिसेंबर – विशाखापट्टणम

प्रश्न: या मालिकेत कोणते मोठे खेळाडू खेळणार नाहीत आणि कोण परतले आहेत?

उत्तर: जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल यांना विश्रांती आहे, तर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर आहे. ऋषभ पंत १५ महिन्यांनंतर वन-डे संघात परतला आहे, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, हर्षित राणा हे नवे चेहरे आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली मात्र खेळणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!