Homeमहाराष्ट्रIndependent candidates are having to campaign without symbols. | अपक्ष उमेदवारांना चिन्हाविना...

Independent candidates are having to campaign without symbols. | अपक्ष उमेदवारांना चिन्हाविना प्रचार करावा लागतोय: निवडणूक चिन्हासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा – Amravati News

अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांना सध्या निवडणूक चिन्हाविनाच प्रचार करावा लागत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, त्यांना २६ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप केले जाईल. मात्र, त्यानंतर केवळ चारच दिवसांन

.

जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये नगराध्यक्षांच्या १२ जागांसाठी १२७ उमेदवार, तर नगरसेवकांच्या २७८ जागांसाठी १ हजार ३२९ उमेदवार रिंगणात आहेत. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणीअंती निकाल जाहीर केला जाईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर होती. परंतु, ज्या आठ उमेदवारांनी आपल्या अर्जांबाबत अपील दाखल केले आहे, त्यांना माघार घेण्यासाठी किंवा रिंगणात कायम राहण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मैदानातील एकूण उमेदवारांची नेमकी संख्याही त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये असा प्रकार घडला नव्हता. एरवी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच चिन्हांचे वाटप केले जाते, ज्यामुळे उमेदवारांना चिन्हासह प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळतो. मात्र, यावेळी पहिल्यांदाच एवढा मोठा कालावधी चिन्हाविना प्रचारात जात आहे. आठ उमेदवारांच्या अपीलमुळे सर्वांना वेठीस धरणे योग्य नाही, असेही जाणकारांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने अपीलार्थींच्या अर्जांवरील निकाल २५ नोव्हेंबरपर्यंत लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना त्यांची निवडणूक चिन्हे मिळतील. चिन्हासह प्रचारासाठी त्यांना केवळ चार दिवसांचा कालावधी मिळणार आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!