Homeदेश-विदेशManager Denies Employee Leave During Wife’s Delivery, Asks Him to ‘Work From...

Manager Denies Employee Leave During Wife’s Delivery, Asks Him to ‘Work From Hospital’; Internet Outraged | Viral: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी कर्मचाऱ्याने मागितली सुट्टी, बॉसने असं उत्तर दिलं की बसेल धक्का! सोशल मीडियावर खळबळ


पत्नीच्या प्रसुतीदरम्यान कर्मचाऱ्यांची रजा: आजच्या कॉर्पोरेट संस्कृतीत वर्क-लाईफ बॅलन्स किती मोठं आव्हान बनलं आहे याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण सोशल मीडियावर समोर आलं आहे. पत्नीची डिलिव्हरी जवळ आली असल्याने दोन दिवसांची रजा मागणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या मॅनेजरने दिलेलं उत्तर ऐकून नेटिझन्स संतापले. ही पोस्ट रेडिटवरील ‘Indian Workplace’ सबरेडिटवर शेअर झाली आणि काही तासांतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ओळख न उघडण्याची अट

त्या कर्मचाऱ्याने सांगितलं की तो आपल्या कंपनीचे नाव किंवा स्वतःची ओळख उघडपणे सांगू शकत नव्हता. कारण कंपनीचा वातावरणच असं आहे की थोडंही विरोध केल्यास नोकरीवर घाला येण्याची भीती असते. पत्नी प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती असूनही रजा मागताना त्याला भीती वाटत होती “माझा मॅनेजर परवानगी देईल का?”

हे ही वाचा: Farah Khan On IVF: ‘मी फक्त रडत राहायचे…’ फराह खानने IVF बद्दल उघडपणे सांगितले, दोनदा झाला फेल

मॅनेजरचा अविश्वसनीय प्रतिसाद

कर्मचारी म्हणतो,“मी शांतपणे दोन दिवस रजा मागितली, कारण पत्नी अॅडमिट होती. पण माझ्या बॉसनं मला जे उत्तर दिलं, ते कल्पनेबाहेरचं होतं.”

मॅनेजरचे प्रश्न आणि तर्क अधिक धक्कादायक,

“ही रजा नंतर घेऊ शकतोस का?”

“तुझे आई-वडील नाहीत का? ते पत्नीला सांभाळू शकत नाहीत का?”

“अगदी गरज असेल तर हॉस्पिटलमधूनच वर्क फ्रॉम होम करू शकतोस.”

कर्मचारी सांगतो की, “मी समजावण्याचा प्रयत्न करत होतो की हॉस्पिटलच्या रूममध्ये मी लॅपटॉप घेऊन बसू शकत नाही. पत्नीची आणि बाळाची काळजी माझी जबाबदारी आहे. पण तो काहीच समजून घ्यायला तयार नव्हता.”

हे ही वाचा: Fátima Bosch: ‘जजचे स्पर्धकासोबत प्रेमसंबंध, अन्… विजेता…’ Miss Universe 2025 मध्ये मोठा वाद

कंपनीतील दबावाचं वातावरण

कर्मचार्‍याने कबूल केले की कंपनीत ‘नो ऑर्ग्युमेंट’ संस्कृती आहे. कोणतंही वाजवी कारण सांगितलं तरी विरोध केला तर मॅनेजमेंट नाराज होतं. याच भीतीपोटी तो बोलायलाही असमर्थ होता. तो म्हणतो की, “मी स्वतःच्या बाळाच्या जन्मापेक्षा मॅनेजरला पटवण्यात जास्त वेळ घालवत होतो… हे किती विचित्र आहे!”

चॅट स्क्रीनशॉटने उघडली खरी कथा

पोस्टसोबत टाकलेल्या चॅटमध्ये दिसतं की, कर्मचारी शांतपणे रजा कळवतो. मॅनेजर कामाच्या डेडलाईनचं कारण देत रजा नाकारणाचा प्रयत्न करतो. ‘आई-वडील सांभाळतील’ असा तर्क देतो. शेवटी कामच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. कर्मचारी म्हणतो, “मी पुन्हा-पुन्हा सांगत होतो की टीममधील इतर लोक काम सांभाळू शकतात. पण तो माझ्याच मागे लागला होता.” शेवटी खूप संघर्ष केल्यानंतरच बॉस म्हणाला की, “ठीक आहे, रजा हवी असेल तर ईमेल करून ठेव.”

माझ्या पत्नीच्या गर्भधारणेदरम्यान माझ्या कंपनीने माझ्या रजेच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले
द्वारेu/Distinct_Problem2466 मध्येभारतीय कार्यस्थळ

सोशल मीडियावर संतापाची लाट

पोस्ट व्हायरल होताच युजर्सनी त्या मॅनेजरवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. नेटिझन्स म्हणाले,

“नोकरी मिळते, पण बाळाचा जन्म हा आयुष्यात एकदाच येणारा क्षण आहे.”

“हा बॉस नसून थेट टॉक्सिक कंट्रोल फ्रीक वाटतो!”

“रजा ही गरज असते, कृपा नाही.”

“सगळं व्हॉट्सअॅपऐवजी ईमेलवर ठेव. भविष्यात पुरावा लागेल.”

“मानवता संपली की असंच दिसतं.”

अनेकांनी त्याला सुचवलं की मॅनेजमेंटच्या दबावाला बळी न पडता रजा घ्यावी.

हे ही वाचा: जिला सगळ्यांसमोर ‘मूर्ख’ म्हणत केलं अपमानित तीच ठरली Miss Universe 2025ची विजेती! जाणून घ्या फातिमा बॉशबद्दल

भारतीय वर्क कल्चरवर पुन्हा प्रश्नचिन्ह

ही घटना एक साधा तणावपूर्ण प्रसंग नसून भारतीय कॉर्पोरेट संस्कृतीतील वर्क-लाईफ बॅलन्स, कुटुंबासमोरील जबाबदारी आणि मॅनेजरच्या संवेदनशीलतेचा अभाव यावर मोठा प्रश्न उभा करते. अनेक युजर्सच्या एकच मते “कुटुंब सर्वात आधी येतं. नोकरी नंतर.”





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!