Homeमनोरंजनॲशेस 2025 मिचेल स्टार्कने पर्थ कसोटीत 10 बळी घेणारा 35 वर्षांतील पहिला...

ॲशेस 2025 मिचेल स्टार्कने पर्थ कसोटीत 10 बळी घेणारा 35 वर्षांतील पहिला गोलंदाज म्हणून इतिहास रचला


मिचेल स्टार्कने ॲशेस 2025 मध्ये इतिहास रचला: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia in England) यांच्यात सुरू असलेल्या एशेज मालिकेच्या पहिल्या टेस्टमध्ये मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) पर्थच्या (Perth) मैदानावर अक्षरशः एकहाती शो लुटला आहे. पहिल्या डावात विध्वंसक गोलंदाजी केलेल्या स्टार्कने दुसऱ्या डावातही तुफानी स्पेल टाकत इंग्लिश फलंदाजांना पुन्हा एकदा गुडघ्यावर आणले. दुसऱ्या सलग इनिंगमध्ये त्यांनी बेन स्टोक्सला बाद करून टीम इंडिया नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

स्टार्कचा दुसऱ्या डावातही कहर

पर्थमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्ये स्टार्कने पहिल्या डावात 7 विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवले होते. दुसऱ्या डावातही त्याचा चेंडू इंग्लंडच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली. परत एकदा आक्रमणावर आल्यानंतर स्टार्कने फक्त 12 धावांत जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांना बाद करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळवला.

हे ही वाचा: W W W W W W W : मिचेल स्टार्कसाठी 21 नोव्हेंबर ठरला ‘गोल्डन डे’, 14 वर्षांत पहिल्यांदा केली अफलातून कामगिरी

35 वर्षांनंतर साध्य केलेले अभूतपूर्व यश

एशेज मालिकेत एका टेस्टमध्ये 10 बळी घेण्याचा पराक्रम स्टार्कने साधला आहे. हा विक्रम मागील 35 वर्षांत कोणीही साधलाच नव्हता. 1990-91 मालिकेत क्रेग मॅकडरमोट यांनी 11 बळी घेतले होते, त्यानंतर प्रथमच एखाद्या गोलंदाजाने ही कामगिरी केली आहे. स्टार्कच्या पहिल्या डावातील 12.5 षटकांत 58 धावांत 7 विकेट्स ही स्वतःतच एक अप्रतिम कामगिरी होती.

बेन स्टोक्स पुन्हा स्टार्कच्या जाळ्यात

बेन स्टोक्सविरुद्ध स्टार्कचा दबदबा पुन्हा एकदा दिसला. आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये स्टार्कने स्टोक्सला तब्बल 11 वेळा बाद केले आहे. स्टोक्सने स्टार्कविरुद्ध 309 चेंडू खेळत 191 धावा केल्या आहेत, पण त्यांचा सरासरी फक्त 17 च्या आसपास आहे  जी त्यांच्या स्तराच्या फलंदाजासाठी खूपच कमी आहे.

यापेक्षा जास्त वेळा स्टार्कने फक्त जॉनी बेअरस्टोला बाद केले आहे, ज्यांना त्यांनी 12 वेळा पवेलियनकडे धाडले आहे.

हे ही वाचा: काय आहे The Ashes? तब्बल 143 वर्षांपूर्वी एका ‘शोकसंदेशातून’ कशी सुरु झाली ‘या’ सिरीजची? जाणून घ्या मनोरंजक कहाणी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. मिचेल स्टार्कने पर्थ टेस्टमध्ये काय ऐतिहासिक कामगिरी केली?

स्टार्कने पर्थ टेस्टमध्ये एकूण 10 विकेट्स घेतल्या, जी एशेज मालिकेत गेल्या 35 वर्षांत कोणत्याही गोलंदाजाने साधलेली कामगिरी नाही.

2. स्टार्कने बेन स्टोक्सला किती वेळा बाद केले आहे?

टेस्ट क्रिकेटमध्ये स्टार्कने बेन स्टोक्सला एकूण 11 वेळा बाद केले आहे.

3. मागील वेळी एशेज मालिकेत एका टेस्टमध्ये 10 किंवा त्याहून जास्त विकेट्स कोणी घेतल्या होत्या?

1990-91 मालिकेत क्रेग मॅकडरमोट यांनी 11 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर ही कामगिरी स्टार्कने केली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!