Homeमहाराष्ट्रMother and child die of electric shock while drying clothes | कपडे...

Mother and child die of electric shock while drying clothes | कपडे वाळवताना विजेचा धक्का; आई-मुलाचा मृत्यू: आईला वाचवताना मुलाचाही दुर्दैवी अंत, नागपूरमधील घटना – Nagpur News


नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयभोले नगर परिसरात शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली. कपडे वाळवत असताना विजेचा धक्का लागून एका आई आणि मुलाचा मृत्यू झाला. निर्मला उत्तम सोनटक्के (वय ५१) आणि त्यांचा मुलगा लोकेश उत्तम सोनटक्के (वय ३१

.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश भानेगाव ओपनकास्ट कोळसा खाणीत एका खासगी कंपनीत काम करत होता. रात्रपाळी संपवून तो शुक्रवारी सकाळी घरी परतला आणि झोपी गेला होता. त्याची आई निर्मला अंघोळ झाल्यावर नेहमीप्रमाणे लोखंडी तारेवर कपडे वाळवत होत्या. या तारेच्या वरच्या भागातून जिवंत विद्युत तारा जात होत्या. कपड्यांना हात लावताच निर्मला यांना जोरदार विजेचा धक्का बसला.

आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेला लोकेश तत्काळ जागा झाला. आई विजेच्या तारेला चिकटून असल्याचे पाहून त्याने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. “आई थांब” असे म्हणत त्याने आईला स्पर्श करताच त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात माय-लेकांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेने जयभोले नगर परिसरात शोककळा पसरली आहे. लोकेश अविवाहित होता, तर त्याचे वडील सिव्हिल मिस्त्री म्हणून काम करतात. सायंकाळी शोकाकुल वातावरणात माय-लेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरिष रुमकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

निर्मला उत्तम सोनटक्के यांचा शॉक लागल्याने मृत्यू झाला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!